शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वर शहर कोरोनामुक्तीच्या मार्गावर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:51 IST

महाबळेश्वर : महाबळेश्वर येथे सक्रिय कोरोनारुग्णांची संख्या एक असून हा एकमेव कोरोना रुग्ण पाचगणी येथे उपचार घेत आहे. आज ...

महाबळेश्वर : महाबळेश्वर येथे सक्रिय कोरोनारुग्णांची संख्या एक असून हा एकमेव कोरोना रुग्ण पाचगणी येथे उपचार घेत आहे. आज शहरात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही, त्यामुळे महाबळेश्वर शहर कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पर्यटनस्थळ हे पर्यटकांसाठी खुले करावे, अशी मागणी शहरात जोर धरू लागली आहे.

दोन दिवसांपूर्वी गवळी आळी येथील एका महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला. या महिलेला उपचारासाठी आता पाचगणी येथे दाखल करण्यात आले आहे. या एका रुग्णामुळे शहरात कोरोना झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७८१ झाली आहे. यापैकी २२ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर ७५८ रुग्ण आजअखेर कोरोनातून बरे झाले आहेत. सक्रिय रुग्णसंख्या १ आहे. शहरातील ४५ वर्षांवरील नागरिकांची संख्या ३०९९ असून, यापैकी १९५५ नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला तर ६२१ नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. शहरातील १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींची संख्या ५०२१ असून, यापैकी १०१७ व्यक्तींनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेला आहे. रोज ठराविक लसी उपलब्ध होत असून लसीकरणाचा वेग मंदावलेला आहे. दरम्यान, पालिकेतील ३२१ कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असल्याची माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली.

सातारा जिल्हा हा कोरोना संसर्गाच्या चौथ्या टप्प्यात असला तरी महाबळेश्वर शहर हे कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे. आता प्रशासनाने महाबळेश्वरबाबत नव्याने विचार करणे आवश्यक आहे. महाबळेश्वर व पाचगणी ही दोन्ही थंड हवेची ठिकाणं ही पर्यटनावर अवलंबून आहेत.

चौकट..

लाॅकडाऊनमुळे आर्थिक गणित कोलमडले...

वीकेंडला महाबळेश्वर शहर वगळता तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल झाले होते. या पर्यटकांना शहरात प्रवेश मिळत नसला तरी शहरालगत असेलेल्या नागरी वसाहतीमध्ये पर्यटकांना निवासासह सर्व सोयीसुविधा मिळत आहेत. अशा स्थितीत शहरात कोरोना नियमांचे कोटकोरपणे पालन करणाऱ्या सर्व व्यावसायिकांवर व नागरिकांवर हा अन्याय आहे. लाॅकडाऊनमुळे सर्वांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अशा स्थितीत प्रशासनाने शहरातील नागरिकांना वेठीस त्यांचा अंत पाहू नये. महाबळेश्वर व पाचगणी ही दोन्ही पर्यटनस्थळे सुरू करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.