शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
2
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
3
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
4
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
5
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
6
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
7
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
8
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
9
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
10
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
11
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
12
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
13
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
14
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
15
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
16
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
17
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
18
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
19
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
20
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

सहकारातील निवडणुकांना याचिकांचा खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : राज्यातील सहकार क्षेत्रातल्या निवडणुकांना उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकामुळे खो बसलेला आहे. आता न्यायालयाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : राज्यातील सहकार क्षेत्रातल्या निवडणुकांना उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकामुळे खो बसलेला आहे. आता न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. सोमवार अथवा मंगळवारपर्यंत न्यायालयाचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, किसन वीर सहकारी साखर कारखाना तसेच कृष्णा सहकारी साखर कारखाना या तीन मोठ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. कोरोनामुळे मुदत संपूनदेखील शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना मुदतवाढ दिली होती. कोरोना चा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने वारंवार त्याला मुदतवाढदेखील देण्यात आली होती.

जिल्हा बँकेसाठी दाखल केलेल्या पूर्वीच्या ठरावांना मान्यता द्यायची की ठराव प्रक्रिया नव्याने करायची, या मुद्द्यावर याचिका दाखल झालेले आहेत. दरम्यान, शासनाने ३१ मार्चपर्यंत निवडणूक घेण्यास स्थगिती दिली होती, त्याविरोधात महाबळेश्‍वर तालुक्‍यातील एका सभासदाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र निवडणुकांवरील स्थगिती उठविण्याचा निर्णय शासनाने घेतला. ही निवडणूकप्रक्रिया ज्या ठिकाणी थांबली तिथूनच तिला सुरुवात करण्यात येणार आहे. शासनाने आदेश काढला असला तरी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असल्याने सहकारातील सर्वच निवडणुकांना खो बसलेला आहे.

नव्याने ठराव घेण्याची प्रक्रिया झाल्यास राजकारण पेटणार

जिल्हा मध्यवर्ती बँक ही सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रमुख अर्थवाहिनी आहे. या बँकेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र राज्यातील सत्तेवर असणाऱ्या महा विकास आघाडी सरकारने कोरोनाचे कारण पुढे करत निवडणुकीला स्थगिती दिली. तसेच सोयीनुसार पुन्हा स्थगिती उठवली. तसेच पूर्वी केलेले ठराव निवडणुकीसाठी ठरवण्यात येत असल्याने निर्माण झालेल्या संभ्रमावस्थेमध्ये भारतीय जनता पार्टीनेदेखील व्यूहरचना लागल्याचे चित्र असून, नव्याने ठराव येण्याची प्रक्रिया झाल्यास जिल्ह्यातील राजकारण चांगलेच भेटणार आहे.