शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Satara: डिस्काउंटच्या नावाखाली पैसे भरुन घेतले, लोकांनी दुकानच लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 15:38 IST

भांडी व फर्निचर दुकानाच्या माध्यमातून घोटाळा

मलकापूर : परप्रांतीय व्यक्तींनी भांडी, फर्निचर व इलेक्ट्रॉनिक वस्तू २५ ते ५० टक्के डिस्काउंटमध्ये आगाऊ बुकिंग करून थोड्या दिवसांनी देण्याचे आमिष दाखवले. आमिषाला बळी पडून शेकडो लोकांनी आगाऊ पैसे भरून गुंतवणूक केली होती. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे समजून लोकांनी संबंधित दुकानाचे कुलूप तोडून 'घावल त्याला पावल' म्हणत वस्तू लंपास केल्या. आज, शुक्रवारी सकाळच्या सुमाराची ही घटना घडली.आगाशीवनगर, मलकापूर ता. कराड येथील वृंदावन कॉलनीमध्ये गेल्या महिन्यात परप्रांतीय व्यक्तींनी सोना ट्रेडर्स नावाचे भांडी फर्निचर व इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीचे दुकान सुरू केले होते. या दुकानात अॅडव्हान्स बुकिंग करून काही मुदतीनंतर वस्तू नेणाऱ्यास पंचवीस टक्के तर काही मुदतीनंतर नेणाऱ्या पन्नास डिस्काउंट देणार अशी पावती गुंतवणूकदाराला देण्यात येत होती. पहिले पंधरा दिवस काही लोकांना वस्तूही मिळाल्या. त्यामुळे वस्तू बुकिंग करणाऱ्यांची संख्या वाढत गेली. संबंधित गुंतवणूकदारांनी वस्तूचे बुकिंग करून संपूर्ण रक्कम जमा केली. संबंधित परप्रांतीय लोक पैसे घेऊन पसार झाले असावेत असा गुतंवणूकदारांचा समज झाला. अन् दुकानाचे शटर तोडून वस्तूंची पळवा-पळवी केली. कोणाला काय सापडेल ते घेऊन जात होता. यावेळी काही गुंतवणूकदारांच्यात बाचाबाची ही झाली. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी त्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी थेट कराड शहर पोलीस ठाणे गाठले. तक्रार घेण्याचे काम पोलीस ठाण्यात सुरू होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Discount Scam Leads to Looting of Shop by Investors

Web Summary : Investors in Malkapur, Satara, looted a shop after a discount scheme turned out to be a fraud. The shop owners, who promised discounts on advance bookings, disappeared with the money. Frustrated investors broke into the shop and stole items.