प्रजासत्ताक दिनाला मर्यादित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:39 IST2021-01-23T04:39:24+5:302021-01-23T04:39:24+5:30

कोरोनाची पार्श्वभूमी : सामाजिक अंतर अन् नियम पाळावे लागणार लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाचा ...

Limited to Republic Day | प्रजासत्ताक दिनाला मर्यादित

प्रजासत्ताक दिनाला मर्यादित

कोरोनाची पार्श्वभूमी : सामाजिक अंतर अन् नियम पाळावे लागणार

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सामाजिक अंतर व सर्व नियम पाळून होणार आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिन समारंभाला मर्यादित शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच उपस्थित राहता येणार आहे. याबाबत आता शासनानेच पत्र काढले आहे.

याबाबत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांना पाठविण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, २६ जानेवारीला ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाचवेळी म्हणजे सकाळी सव्वानऊ वाजता करण्यात यावा. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाने केलेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच प्रजासत्ताकदिन समारंभाला मर्यादित शासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर आणि सर्व नियम पाळणे ही आयोजकांची जबाबदारी असेल, असेही त्यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

......

Web Title: Limited to Republic Day