शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चौकाचौकातील बॅनरवरून नेते गायब

By admin | Updated: October 27, 2015 23:55 IST

ग्रामपंचायत निवडणूक : उंब्रजला उमेदवारांच्या भेटीगाठी वाढल्या

अजय जाधव--उंब्रज ग्रामपंचयतीच्या निवडणुकीत रणांगण चांगलेच तापले असून, संपूर्ण गाव बॅनरने सजले असून ‘सोशल मीडियाच्या’ माध्यमातून प्रचारही जोरात सुरू आहे.उंब्रज ग्रामपंचायतीच्या निवडणूक ही १७ जागासाठी होत आहे. यासाठी रणांगणात ४८ उमेदवार आहेत. ४ पॅनेलसह अपक्ष उमेदवारांनी आपले बॅनर लावली आहेत. ग्रामदैवतासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो, राष्ट्रसंतापासून अब्दुलकलामांचे फोटो, यशवंतराव चव्हाणाच्या पासून पी.डी. पाटील यांचे फोटो बाळासाहेब ठाकरे पासून कऱ्हाडच्या ३ आमदाराचे फोटोविविध बॅनेरवर झळकत आहेत. या फोटोसह फक्त उमेदवारांचे फोटो चिन्हे छापण्यात आली आहेत.सोशल मिडीयावर व्हॉटस्अ‍ॅपवर असलेल्या पूर्वीच्या ग्रुपवर अनेक उमेदवार व कार्यकर्ते अजुनही एकत्रच आहेत. या ग्रुपवर कार्यकर्त्याकडून उमेदवारांचे फोटो, चिन्हे, व्हिडीओ, व्हाईस रेकॉर्डींगचा वापर होत आहे. परस्पर विरोधी उमेदवार कुटुंबीय एकत्र ग्रुपवर असले, तरी सवर्जण हे प्रकार एन्जॉय करताना दिसत आहेत. शक्यतो वाद विवाद सर्वच पॅनेल कार्यकर्त्यांकडून टाळले जात आहेत आणि हे उंब्रजचे वैशिष्ट्ये आहे.बॅनेरबाजी, सोशल मिडियासह उमेदवार व कार्यकर्त्यांनी थेट मतदाराच्या गाठीभेटी घेण्यावरही जोर धरला आहे. ज्या ठिकाणी मतदारांशी थेट ओळख नाही तेथे कार्यकर्त्यांचा मित्राचा वापर करून थेट संपर्क साधले जात आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवाराकडून सर्वच प्रयोग केले जातात. काही ठिकाणी जेवणावळीला सुरुवात झालीआहे. काही चेहरे सर्वच ठिकाणी जेवणावळीत सहभागी होत आहेत. अशांचे मतदान कोणाला या उमेदवारही संभ्रमात आहेत. काही ठिकाणी मतासाठी हा उमेदवार ऐवढी रक्कम देणार तो तेवढी देणार याची खुमासदार चर्चा सुरू आहे. या प्रकारामुळे निवडणूक रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे. पडद्यामागील सूत्रधार अबाधित..सर्वच पॅनेलसह अपक्षाचे गावभर बॅनर लावली आहेत. परंतु या सर्वच बॅनेर गावपातळीवरील कोणत्याच नेत्यांचे फोटो नाहीत. अनेकजणांनी नेता नाराज होऊ नये म्हणून कोणाचेच फोटो छापले नाहीत. तर काहीजणांनी नुता गुलदस्त्यात ठेवून पडद्यामागील सूत्रधार अबाधीत ठेवले आहेत. अशी चर्चा ग्रामस्थांच्यात आहे.