शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव रेल्वे मालधक्कासाठी प्रयत्न करणार : मुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:12 IST

कोरेगाव : ‘कोरेगाव हे व्यापारी केंद्र असून, साताऱ्यासह लगतच्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी कोरेगाव रेल्वे स्थानक परिसरात ...

कोरेगाव : ‘कोरेगाव हे व्यापारी केंद्र असून, साताऱ्यासह लगतच्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी कोरेगाव रेल्वे स्थानक परिसरात मालधक्का होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत,’ अशी माहिती पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य भरत मुळे यांनी दिली.

मुळे यांनी शुक्रवारी दुपारी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत कोरेगाव रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी वरिष्ठ स्थानक प्रबंधक भरतलाल मीना व प्रदीप फाळके यांनी त्यांचे स्वागत केले. रेल्वेच्यावतीने सुरु असलेल्या प्रकल्पांची माहिती फाळके यांनी दिली. मुळे म्हणाले, ‘कोरेगावसाठी रेल्वेने सुविधा वाढविणे गरजेचे आहे. रेल्वेकडे मुबलक जागा असल्याने मालधक्क्यासह जलद गाड्यांना थांबा मिळावा. पुणे - मिरज - कोल्हापूर दरम्यान जलद पॅसेंजर सुरू करावी व तिला कोरेगावात थांबा देण्यात यावा, रेल्वे कॅन्टिनधारकांप्रमाणेच फेरीवाल्यांची वैद्यकीय तपासणी करावी व मगच त्यांना विक्री परवाना द्यावा, कचरा व्यवस्थापन फेरीवाल्यांनी स्वत: करावे यासाठी संबंधितांना समज द्यावी, आदी सूचना लवकरच होणाऱ्या विभागीय सल्लागार समिती सभेत करणार आहे.’

यावेळी झालेल्या चर्चेत अमोल भूतकर, बबन कांबळे, श्रेयस काणे यांनी भाग घेतला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष जाधव, महिला आघाडी तालुकाध्यक्षा उज्ज्वला निकम, उपाध्यक्षा सुषमा निकम, भाऊ मतकर, राजेंद्र मतकर, जवानसिंग घोरपडे, महेश वडगावी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

चौकट :

महाराष्ट्र एक्सप्रेसला सवलत द्या

रेल्वेने कोरोनामुळे आरक्षण व्यवस्थेत बदल केला आहे, तो समाधानकारक आहे. मात्र, गोंदिया-कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसचे बुकिंग एक्सप्रेस सुरु झाल्यानंतरसुद्धा पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत करता येण्यासाठी संगणकीकृत बुकिंग सेवा उपलब्ध करावी. एक्सप्रेस सुटण्यापूर्वी बुकिंग बंद केले जाते, मात्र ही एक्सप्रेस दुसऱ्या दिवशी पुण्यापासून कोल्हापूरपर्यंतचा प्रवास करते. त्यामुळे या एक्सप्रेसला विशेष सवलत मिळावी, अशी मागणी करणार असल्याचे मुळे यांनी सांगितले.

फोटो नेम :

२०कोरेगाव रेल्वे बैठक.

कोरेगाव रेल्वे स्थानकाची भरत मुळे यांनी शुक्रवारी पाहणी केली. यावेळी अमोल भूतकर, महेश वडगावी, प्रदीप फाळके, बबन कांबळे, संतोष जाधव, उज्ज्वला निकम, सुषमा निकम उपस्थित होते. (छाया : साहिल शहा)