शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

‘कास’ तलावाला आलं बेटाचं स्वरूप!

By admin | Updated: May 22, 2015 00:21 IST

पाणीपातळी झपाट्याने खालावली : तलावात उरला आठ फूट पाणीसाठा

पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावातील पाणीपातळी कमी झाली असून, काही ठिकाणी उघड्या पडलेल्या जमिनीमुळे कास तलावाला ‘बेटा’चे स्वरूप आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत सध्या एक फूट जास्त पाणीसाठा असला तरी तलावात सध्या आठ फूट आठ इंच इतका पाणीसाठा शिल्लक आहे.शहाराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावात एकूण तीन व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी एक व्हॉल्व्ह पूर्णपणे उघडा पडला असून, दुसरा व्हॉल्व्हदेखील काही दिवसांत उघडा पडणार आहे. तिसऱ्या व्हॉल्व्हसाठी बसवण्यात आलेली संरक्षक जाळी सध्या दिसत असून, तलावात एकूण सध्या ८ फूट ८ इंच इतका पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत जरी तलावात एक फुटाने पाणीसाठा जास्त असला तरी पूर्णपणे वरुणराजावर विसंबून राहावे लागणार आहे. वेळेत पाऊस पडला नाहीतर सातारकरांना तहान भागवणे जिकिरीचे बनणार आहे.तलावातील पाण्याची पातळी खालावत चालल्याने ठिकठिकाणी जमिनी उघड्या पडून बेटाचे स्वरूप येऊ लागले आहे. चोहोबाजूला पाणी असणाऱ्या या बेटावर जाण्यासाठी पर्यटकांची गर्दी होताना दिसते. परंतु घसरटी माती व अरुंद जमीन पाहता हुल्लडबाजी करणाऱ्या तरुण वर्गासाठी धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही कित्येक पर्यटक या ठिकाणी आपला जीव मुठीत धरून ‘फोटोसेशन’ करताना दिसत आहे. चार फूट पाणी शिल्लक राहिल्यानंतर व्हॉल्व्हमधून पाणी येत नाही. तेव्हा इंजिनद्वारे पाणी उपसून कॅनॉलमधून सोडले जाते. त्यानंतर पाणीपुरवठा केला जातो. (वार्ताहर)सध्या तलावातील पाणीसाठा पाहता एक ते दीड महिना पाणी पुरू शकेल. तरी सर्वांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे.- बापू किर्दत, पाटकरी कास तलावपर्यटकांसाठी हे बेट म्हणजे पर्वणीच या ठिकाणी जाऊन आनंद घ्यावा; परंतु अतिउत्साही हुल्लडबाजी करणाऱ्यांवर निर्बंध घालावेत, यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने पालिकेने उपाययोजना करावी.- सुभाष जाधव,पर्यटक, सातारा