शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वाठार स्टेशनमध्ये कर्नाटक पोलिसांचा गोळीबार !

By admin | Updated: May 25, 2016 23:30 IST

मंगळवेढ्यापासून खंडाळ्यापर्यंत थरारक पाठलाग : दोन आरोपी ताब्यात; मात्र स्थानिक पोलिस अनभिज्ञ

वाठार स्टेशन : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याच्या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी कर्नाटकच्या पोलिसांनी वाठार स्टेशनपर्यंत त्यांचा थरारक पाठलाग केला. त्यावेळी वाग्देव चौकातून पळून चाललेल्या आरोपींना अडविण्यासाठी या पोलिसांनी गोळीबारही केला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी वाठार स्टेशन, ता. कोरेगाव येथील वाग्देव चौकात नेहमीप्रमाणे शांतता होती. सकाळी साडेआठच्या सुमारास या चौकात एका ट्रीपल सीट दुचाकीला मागून भरवेगात आलेल्या कारमधील तीन-चार लोकांनी अडविले. तेव्हा दुचाकीवरील तिघेही सैरावैरा पळू लागले. त्याचवेळी अचानक गोळीबार झाल्याचा आवाज आला. एकाला त्यांनी पकडलेही. त्यामुळे चौकात गर्दी जमू लागली; मात्र ‘गोळीबार कोणी केला, या कारमधील लोक कोण आणि दुचाकी टाकून पळून जाणारे कोण?’ या प्रश्नांभोवती चर्चा रंगली. ‘अखेर कारमधील लोक कर्नाटकमधील कोप्पळ जिल्ह्यातील पोलिस असून, त्यांना एका गुन्ह्याखाली मंगळवेढा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन आरोपी पकडायचे होते. त्यासाठी फलटणपासून दुचाकीवरील आरोपींचा पाठलाग कर्नाटक पोलिस करत होते,’ अशी माहिती येथील स्थानिकांना मिळाली. असे असले तरी कर्नाटक पोलिसांचे हे थरारनाट्य वाठार पोलिसांनाच माहीत नसल्याने जिल्ह्यातील यंत्रणेपुढेही अनेक तांत्रिक प्रश्न निर्माण झाले आहेत. (वार्ताहर) दुसऱ्याला खंडाळ्यातून उचलले!तीन आरोपींपैकी एकाला वाठार स्टेशनमध्ये पकडण्यात यश आले. मात्र, दोघेजण पसार झाले. त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी पहिल्या आरोपीला ताब्यात घेऊन खंडाळ्याकडे प्रस्थान केले. त्याठिकाणीही त्यांना आणखी एकजण मिळून आला. या दोघांना घेऊन कर्नाटक पोलिस तपासासाठी पंढरपूरकडे घेऊन गेल्याची माहिती मिळाली आहे. बुधवारी सकाळी साठेआठच्या सुमारास वाठार स्टेशन येथे घडलेल्या घटनेबाबत संबंधित कर्नाटक पोलिसांनी आम्हास कोणतीही मदत मागितली नव्हती. पकडलेला आरोपी मंगळवेढा तालुक्यातील असल्याने त्या पोलिस ठाण्यात त्यांनी पत्रव्यवहार केला होता. याबाबत आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही.- शहाजी निकम, सहायक पोलिस निरीक्षक, वाठार पोलिस स्टेशन