शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉ'क; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
2
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
3
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
4
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
5
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
6
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
7
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
8
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
9
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
10
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
11
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
12
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
13
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
14
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
15
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
16
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
17
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
18
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
19
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
20
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडची वाहतूक शाखा ‘राम’भरोसे!

By admin | Updated: November 7, 2014 00:09 IST

शाखेला ‘कुरण’ बनवलंय. या कुरणात फौजदाराऐवजी सध्या कर्मचारीच चरत असल्याचे चित्र

संजय पाटील - कऱ्हाड  -वर्दीतल्या काहीना ‘साहेब’ व्हायची भारी हौस असते. चारचौघांत आवाज वाढवायचा, कॉलर ‘टाईट’ करायची आणि शिपाई असूनही फौजदाराचा रुबाब झाडायचा. शहर पोलीस ठाण्यातल्या वाहतूक शाखेतही सध्या अशा स्वयंघोषित साहेबांचा सुकाळ आहे. काहीचा वर्षापासून तर काहीचा अनेक महिन्यांपासून एकाच ठिकाणी ठिय्या असल्यामुळे त्यांनी वाहतूक शाखेला ‘कुरण’ बनवलंय. या कुरणात फौजदाराऐवजी सध्या कर्मचारीच चरत असल्याचे चित्र आहे. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी संभाजी पाटील व उपअधीक्षकपदी विजय दळवी कार्यरत असताना वाहतूक शाखा चांगलीच वादात सापडली होती. शाखा ढेपाळल्यामुळे व कर्मचाऱ्यांची ‘फौजदारकी’ वाढल्यामुळे त्यावेळी उपअधीक्षक दळवी यांनी ही शाखा उपविभागीय कार्यालयाशी जोडली. स्वत: उपअधीक्षक दळवी यांनी काहीकाळ वाहतूक शाखा सांभाळली. कर्मचाऱ्यांना सूतासारखे सरळ केले आणि त्यानंतर पुन्हा ही शाखा शहर पोलीस ठाण्याशी जोडण्यात आली. सध्याही वाहतूक कर्मचाऱ्यांकडून त्यावेळचाच कित्ता गिरवला जातोय. ‘हम करे सो कायदा’ ही वृत्ती बळावल्याने शाखेचा कारभार ‘राम’भरोसे झालाय. मुळात कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांचा दबाव असणे गरजेचे असते. मात्र, शहर पोलीस ठाण्यात नेमके याच्या उलट चित्र आहे. काही कर्मचाऱ्यांची ‘पाटीलकी’ एवढी वाढलीय की, ते फौजदारालाही जुमानत नाहीत. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवता येईल एवढे कर्मचारी सध्या या शाखेत कार्यरत आहेत. मात्र, वाहतूक सांभाळण्याऐवजी स्वत:चे खिसे गरम करण्यातच काही कर्मचारी व्यस्त आहेत. काहीना वाहतुकीऐवजी पावत्या बनविण्याचा ‘घोर’ ‘पड’लाय. तर काहीजण शहर सोडून चक्क महामार्गावर आपलं वसुलीचं ‘घोडं’ दामटतायत. काही महिन्यांपूर्वी शाखेतला एकजण ‘खाकी’ऐवजी ‘खादी’ घालून ‘पाटण’च्या मार्गावर चकरा मारताना दिसायचा. सध्या तो गायब झाला असला तरी वडापवाल्यांमागची साडेसाती ‘मुळी’च संपलेली नाही. ‘साठे’लोटे असतानाही त्यांना पोलिसांच्या नावाखाली अन्य काहीजणांना खूष करावंच लागतंय. पावत्यांचा ‘घोर’ ‘पड’लेले, वसुलीचं ‘घोडं’ दामटणारे, ‘खादी’ घालून ‘पाटण’च्या मार्गावर चकरा मारणारे, वडापवाल्यांना ‘मुळी’च न सोडणारे आणि ‘साठे’लोटे असणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सध्या ही शाखा बदनाम होतेय. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘राम’भरोसे सुरू असणाऱ्या या शाखेच्या कारभाराकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे. वाहतूक बिघडली, शाखाही विस्कटलीकऱ्हाडातील कोल्हापूर नाका, दत्त चौक, मुख्य बाजारपेठ, कृष्णा नाका, कृष्णा कॅनॉल ही गर्दीची आणि रहदारीची ठिकाणे आहेत. या मार्गांवर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते; पण सिग्नलचे पॉइंट वगळता इतर महत्त्वाच्या ठिकाणी अपवाद वगळता कधीही वाहतूक कर्मचारी दृष्टीस पडत नाही. या शाखेची जबाबदारी आत्तापर्यंत अनेक अधिकाऱ्यांनी पेलली आहे. त्यामध्ये तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक हरीष खेडकर, सुनील दोरगे, यशवंत ढगे, शिवाजी कदम, धनंजय पिंगळे, प्रदीप शिंदे, विद्या जाधव यांचा समावेश आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी वाहतुकीला शिस्त लावण्याबरोबरच कर्मचाऱ्यांनाही त्या-त्यावेळी शिस्तीचे ‘डोस’ दिले होते. सध्या मात्र वाहतुकीबरोबरच कर्मचाऱ्यांवरही अंकुश ठेवण्याचे आव्हान अधिकाऱ्यांसमोर आहे.