शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडला १३४ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक बहुमताने मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:55 IST

कऱ्हाड : सुमारे दोन कोटी रुपये शिलकीचे, एकूण १३४ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक गुरुवारी झालेल्या कऱ्हाड पालिकेच्या विशेष सभेत बहुमताने ...

कऱ्हाड : सुमारे दोन कोटी रुपये शिलकीचे, एकूण १३४ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक गुरुवारी झालेल्या कऱ्हाड पालिकेच्या विशेष सभेत बहुमताने मंजूर करण्यात आले. सुरुवातीला भाजप नगरसेवकांकडून सूचना मांडत अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मात्र, त्यात अनेक चुका असल्याचे निदर्शनास आणत जनशक्ती आघाडीने उपसूचना मांडली. ती बहुमताने मंजूर केली, पण सूचना की उपसूचना मंजूर यावरून सभागृहात गदारोळ पाहायला मिळाला.

कऱ्हाड येथे पालिकेची विशेष सभा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे घेण्यात आली. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

नगराध्यक्षा शिंदे अर्थसंकल्पीय मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, आजचा अर्थसंकल्प विकासाभिमुख आहे; लोकांच्या फायद्याचा आहे. सन २०२१-२२ सालच्या अर्थसंकल्पात सुरुवातीच्या शिलकेसह जमेच्या बाजूस ७२ कोटी ११ लाख ३५ हजार ३३८ रुपये व खर्चाच्या बाजूस ५५ कोटी ९९ लाख ६६ हजार ९२० रुपये दर्शविले आहेत.

भांडवली अर्थसंकल्प भाग २ मध्ये आरंभीच्या शिलकेसह ६२ कोटी ६७ लाख ८५ हजार ५१२ रुपये व खर्चाच्या बाजूला ६० कोटी ५८ लाख ९४ हजार ७०४ रुपये दर्शविली आहे. असे एकूण १३४ कोटी ८९ लाख वीस हजार रुपये होत आहेत.

लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील म्हणाले, अर्थसंकल्प हा सत्ताधाऱ्यांचा कामाचा आरसा असतो. तो फारसा चांगला दिसत नाही, अशी टीका करत या अर्थसंकल्पामध्ये कोणताही महत्त्वाकांक्षी प्रकल्प दिसत नाही. त्यामुळे कऱ्हाडकरांचा विश्वासघात करणारा हा अर्थसंकल्प असल्याचा घणाघात त्यांनी केला.

पालिकेच्या अर्थसंकल्पात उत्पन्नवाढीचे कोणतेच प्रयोजन नाही. उलट वर्षभरात होर्डिंग्सचे भाडे आले नाही, पण त्या अगोदर तीन वर्षांच्या होर्डिंग्सचे भाडे थकीत आहे याकडे लक्ष वेधले. दोन वर्षांत पालिकेने करमणूक कर वसूलच केलेला नाही, ही गोष्ट ही निदर्शनास आणून दिली. या व इतर बाबींकडे दुर्लक्ष करीत पालिका नको त्या गोष्टींची भाडेवाढ करून धूळफेक करत असल्याचा आरोपही सौरभ पाटील यांनी केला.

आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी बजेटमध्ये फार कोणतीही वाढ करायची नाही, असे स्टॅंडिंग कमिटीच्या बैठकीत ठरले होते. असे असताना बजेटमध्येही वाढ आलीच कशी, असा मुद्दा उपस्थित करीत प्रशासनाला धारेवर धरले, तर काही उपसूचना मांडल्या.

जनशक्ती आघाडीच्यावतीने स्टेडियमची केलेली भाडेवाढ अवास्तव असून ती अमान्य करत रद्द करण्याची उपसूचना मांडली. ट्रान्सपोर्ट सेंटरची जुनी इमारत पाडून नवीन चांगली वास्तू उभी करणे अशा अनेक सूचना त्यांनी मांडल्या, पण सूचना की उपसूचना मंजूर करायची यावरून सभागृहात शेवटी गदारोळ पाहायला मिळाला.

चौकट

ते परस्परच कारभार चालवत असतील तर ...

स्टॅंडिंगच्या बैठकीत नसणारे विषय अर्थसंकल्पात कसे आले यावरून बरीच चर्चा झाली. याचा जाब अनेक नगरसेवक विचारू लागले, पण उत्तर द्यायला मुख्याधिकारी रमाकांत डाकेच उपस्थित नव्हते. त्यामुळे मुख्याधिकारी परस्पर पालिकेचा कारभार चालवणार असतील, तर आपण निवडून येऊन उपयोग तरी काय ? असा सवाल अनेक नगरसेवकांनी उपस्थित केला.