शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सलमानला शिक्षा ठोठावणारे न्यायाधीश साताऱ्यात येणार

By admin | Updated: May 8, 2015 00:18 IST

उपजिल्हा न्यायाधीशपदी नियुक्ती : सुटीनंतर जूनपासून होणार रुजू

सातारा : फिल्मस्टार सलमान खानला २००२ मधील ‘हिट अँड रन’ खटल्यात पाच वर्षांची सजा फर्मावणारे न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांचा मुंबईतील हा शेवटचा निकाल आहे. निकालापूर्वीच त्यांच्या बदलीचे आदेश निघाले असून, ते सातारा न्यायालयात उपजिल्हा न्यायाधीश म्हणून जूनच्या पहिल्या आठवड्यात पदभार स्वीकारणार आहेत.‘हिट अँड रन’ खटल्यात सलमानवर सदोष मनुष्यवधाच्या आरोपाची निश्चिती न्यायाधीश देशपांडे यांनीच केली. या खटल्यात त्यांनी सरकार पक्षाचे २७ तर बचाव पक्षाचा एक असे २८ साक्षीदार तपासले. सलमानला ४२१ प्रश्न विचारणारे न्यायाधीश देशपांडे या खटल्यानंतर सुटीवर जाणार आहेत. सातारचे उपजिल्हा न्यायाधीश म्हणून त्यांची बदली काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. तथापि, सुरू असलेल्या खटल्यांचा निकाल दिल्यानंतरच त्यांना तेथील पदभार सोडावयाचा होता. त्यामुळे सलमानचा खटला हाच मुंबईतील कारकीर्दीतील त्यांचा शेवटचा खटला ठरला आहे. त्यांची बदली हा नियमित बदलीचा भाग असल्याचे हायकोर्टाच्या रजिस्ट्रारने स्पष्ट केले आहे. न्यायाधीश देशपांडे मूळचे नागपूरचे असून, मुंबईला सत्र न्यायालयात २०१२ मध्ये त्यांची नियुक्ती झाली. २०१४ मध्ये त्यांनी ‘सीबीआय’चे विशेष न्यायाधीश म्हणून काम पाहिले. मुंबईत ते प्रथम दादरच्या न्यायालयात अतिरिक्त न्यायदंडाधिकारी होते. डिसेंबर २०१३ पासून सलमानच्या ‘हिट अँड रन’ खटल्याची सुनावणी त्यांच्यापुढे सुरू झाली. २०१४ मध्ये विशेष न्यायाधीश म्हणून काम पाहिले असले, तरी त्यांच्यासमोर कोणताही महत्त्वाचा खटला चालला नाही. सलमानचा खटलाच त्यांच्या कारकिर्दीतील ‘हाय प्रोफाइल’ ठरला. मुंबईत नियुक्ती होण्यापूर्वी न्यायाधीश देशपांडे यांनी अलिबागमध्ये जिल्हा न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे. सलमानच्या खटल्यानंतर न्यायाधीश देशपांडे प्रसिद्धीच्या झोतात आले. (प्रतिनिधी)