सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात प्रधान सचिवांचा पायी प्रवास

By Admin | Updated: April 26, 2016 00:23 IST2016-04-25T22:17:32+5:302016-04-26T00:23:35+5:30

वनाधिकाऱ्यांचा समावेश : बावीस किलोमीटर अंतरात पाहणी

The journey of the Principal Secretaries in Sahyadri Tiger Reserve | सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात प्रधान सचिवांचा पायी प्रवास

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात प्रधान सचिवांचा पायी प्रवास

कऱ्हाड : मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी व्याघ्र प्रकल्प परिसराचा दौरा करून या भागाची पाहणी केली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या संरक्षणासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, परदेशी यांचा दौरा हा त्याचाच एक भाग आहे. परदेशी यांनी माल्देव ते नवजा असा २२ किलोमीटर पायी दौरा केला.
कोयना जलाशयातील बोटिंग सध्या बंद असून, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे व नाना खामकर यांनी बोटिंग सुरू करण्याची मागणी परदेशी यांच्याकडे केली. त्याबाबत परदेशी यांनी जिल्हा पोलिस प्रमुखांशी चर्चा केली. व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांची रिक्त पदे तत्काळ भरण्याबाबतही त्यांनी सूचना देत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. व्याघ्र प्रकल्पाचे डॉ. क्लेमेंट बेन, वनक्षेत्रपाल राजेंद्र पाटील, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांची यावेळी उपस्थिती होती.
परदेशी यांनी सह्याद्री प्रकल्पाची पाहणी करताना सुरुवातीला कांदाटी खोऱ्यातील ज्या गावांचे पुनर्वसन ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे करण्यात येणार आहे.
त्या प्रक्रियेच्या अनुषंगाने सूचना केल्या. त्यानंतर सह्याद्री प्रकल्पाची चालत पाहणी करून त्या भागातील विकासकामे नेमकी कोणत्या स्थितीत आहेत, याची माहिती घेतली. (प्रतिनिधी)

Web Title: The journey of the Principal Secretaries in Sahyadri Tiger Reserve