शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत बसेना मेळ, साताऱ्यात घालमेल!

By admin | Updated: September 22, 2014 22:04 IST

महायुतीत अस्वस्थता : माण-खटाव, फलटण मतदारसंघांनी वाढविलाय तिढा

सागर गुजर - सातारा  -महायुतीमधील जागावाटपांचा घोळ अजून कायम आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या महायुतीच्या संभाव्य उमेदवारांची भलतीच घालमेल सुरु आहे. तिकीट मिळेल या अपेक्षेने पक्षात शिरकाव करणाऱ्या पक्षाबाहेरील इच्छुकांची भीती आधीच होती. आता महायुतीतील जागावाटपाचा तिढा अधिकच ताणला गेल्याने मतदारसंघच हातातून निसटतोय काय, या धास्तीने विशेषत: शिवसेना व भाजपच्या जिल्ह्यातील इच्छुकांची झोप उडाली आहे.भाजप व शिवसेनेच्या युतीमधील पूर्वीच्या करारानुसार सातारा, कऱ्हाड दक्षिण व माण-खटाव मतदारसंघ भाजपकडे तर फलटण, वाई, पाटण, कऱ्हाड उत्तर, कोरेगाव हे मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीवेळी खासदार रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष, महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष व खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी पक्ष यांना सोबत घेऊन महायुती निर्माण झाली. फलटण व कऱ्हाड उत्तर मतदारसंघावर ‘स्वाभिमानी’ने तर माण-खटाववर राष्ट्रीय समाज पक्षाने दावा सांगितला आहे. या तीनही मतदारसंघांत भाजप व शिवसेनेला घटकपक्षांच्या बाजूने कौल द्यावा लागणार आहे, अशी परिस्थिती आहे. माण-खटाव हातून गेल्यास वाई किंवा कोरेगाव मागून घ्यायचा, अशा हालचाली भाजपमध्ये सुरु आहेत. वाईतून पुरुषोत्तम जाधव किंवा माजी आमदार मदन भोसले यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली आहेत. असे झाले तर नुकतेच शिवसेनेत गेलेले महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. जर कोरेगाव मिळाला तर माजी आमदार कांताताई नलावडे किंवा महेश शिंदे यांना पालकमंत्र्यांविरोधात उभे करण्याच्या हालचाली भाजपमध्ये सुरु आहेत. मात्र, राजकीय घडामोडीत शिवसेनेचे इच्छुक असणारे दिनेश बर्गे, दत्ताजी बर्गे, हणमंत चवरे यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.माण-खटाव रासपला गेल्यास भाजपचे डॉ. दिलीप येळगावकर, ओबीसी विभागाचे राज्य सरचिटणीस धनंजय ओंबासे, जिल्हासरचिटणीस बाळासाहेब खाडे, बाळासाहेब मासाळ, डॉ. महादेव कापसे या इच्छुकांना केवळ ‘मम’ म्हणण्याची वेळ येणार आहे. येथून अपक्ष उमेदवारी जाहीर केलेले शेखर गोरे यांनी सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. साताऱ्यातून दत्ताजी थोरात, सुवर्णा पाटील, रवींद्र पवार यांच्या हालचाली वेगवान आहेत. माजी आमदार सदाशिव सपकाळ यांच्या पक्षप्रवेशामुळे या इच्छुकांची घालमेल वाढली आहे. वाई किंवा कोरेगावच्या बदल्यात हा मतदारसंघाला शिवसेनेला मिळाला तरी पक्षातील पाखरे आधीच उडून गेले असल्याने या ठिकाणी सेनेला उमेदवाराची शोधाशोध करावी लागणार आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष दीपक पवार भाजपची उमेदवारी मिळण्याच्या अपेक्षेत आहेत; मात्र ती मिळाली नाही तरी लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केल्याने सातारा-जावळीचे वातावरण भलतेच तापले आहे.‘आयारामांना विरोध’ हाच भाजपचा अजेंडाविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी मिळण्याच्या अपेक्षेने भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांना उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका जिल्ह्यातील भाजप निष्ठावंतांनी घेतली आहे. मात्र, भाजपच नव्हे, तर शिवसेनेतही ‘आयात’ उमेदवार अनेक ठिकाणी गर्दी झाली आहे. भाजपमधून राष्ट्रवादी आणि पुन्हा भाजप असा प्रवास करणाऱ्या डॉ. दिलीप येळगावकरांनाही अनेकांनी विरोध केला होता. तथापि, ‘निवडून येण्याची क्षमता’ हा निकष लावल्यास अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांतील निष्ठावंतांवर नाराज होण्याची वेळ येऊ शकते.