शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रेटून खोटं बोलण्यात जयकुमार पटाईत!

By admin | Updated: October 28, 2015 00:03 IST

शेखर गोरेंचा पलटवार : कामाचे श्रेय घेऊन फलक लावल्यास उखडून टाकण्याचा इशारा

म्हसवड : देवापूर गावची ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यापासून विरोधकांकडून माझ्या कार्यकर्त्यांना दमबाजी सुरू असून, ती त्यांनी थांबविली नाही तर गाठ शेखर गोरेंशी असल्याचा इशारा देत विद्यमान आमदार इतरांच्या कामाचे श्रेय घेण्यास पटाईत असून, आजवर त्यांचे विरोधक शांत बसत होते. ते खोटं बोल पण रेटून बोलण्यात पटाईत आहेत. माझ्या कामाचे श्रेय घेऊन विकासकामाचा त्यांनी यापुढे बोर्ड लावल्यास तो उखडून टाकण्याचा इशाराही यावेळी राष्ट्रीय समाजपक्षाचे सरचिटणीस शेखर भाऊ गोरे यांनी दिला.देवापूर ग्रामपंचायतीच्या त्यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक लढवत असलेल्या शंभू महादेव ग्रामविकास पॅनेलच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष युवराज बनगर, प्रा. विश्वंभर बाबर, सरपंच कांचन बाबर, रासपाचे आप्पासाहेब पुकळे, मार्केट कमिटीचे संचालक कैलास भोरे, शहाजी बाबर, किरण बाबर, शेखरभाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू जाधव, तुषार विटकर यावेळी उपस्थित होते.शेखर गोरे म्हणाले, ‘देवापूर गावचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वोतोपरी मदत यापुढील काळात केली जाईल. येथील जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी मी कटिबद्ध असून, येथील जनतेला शंभू महादेव ग्रामविकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी राहावे,’ असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. ते पुढे म्हणाले, ‘सर्वसामान्य युवकांच्या पाठबळावर विधानसभा निवडणुकीत नंबर दोनची ५३ हजार मते घेतली. त्यावेळी माझ्याबरोबर युवकांची संख्या मोठी होती परंतु आता माझ्या बरोबर युवकांबरोबरच सर्वसामान्य जनतेचे पाठबळ वाढत आहे. (प्रतिनिधी)सर्वसामान्यांचे पाठबळ महत्त्वाचेयापुढील काळातील सर्व निवडणुका सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावर व विश्वासावर जिंकून दाखवेन असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.’ यावेळी बोलताना युवराज बनगर म्हणाले, ‘शेखरभाऊंच्या रुपाने जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक स्वखर्चातून करणारे नेतृत्त्व आम्हाला लाभले असून, या नेतृत्त्वाने कोण कोणत्या पक्षाचा हे न पाहता सर्वसामान्यांना जी आर्थिक मदत केली त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. प्रा. विश्वंभर बाबर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.