शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात घुमला ‘जय मल्हार’

By admin | Updated: July 15, 2014 01:06 IST

धनगर समाज : अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा

सातारा : एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी सातारा जिल्हा धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबाजावणी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी धडक मोर्चा काढला. या मोर्चात धनगर समाज पारंपरिक वेशभूषा, गजीढोल व मेंढ्यांसह सहभागी झाला होता. दरम्यान, आमच्या आरक्षणावर तातडीने निर्णय न झाल्यास विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.बसस्थानकापासून दुपारी बारा वाजता मोर्चास सुरुवात झाली. पोवई नाक्यावरून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरक्षणासंदर्भात मागणी केली. त्यानंतर शिष्टमंडळाने मागण्यांचे निवदेन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील धनगर समाज मागील सुमारे ६५ वर्षांपासून अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबाजवणीपासून वंचित आहे. भारतीय राज्य घटनेच्या अनुसूचित जमातीच्या यादीत धनगर समाजाचा समावेश असूनही केवळ राज्य शासनाने केंद्राकडे शिफारस न केल्यामुळे या समाजाला सवलतीचा लाभ मिळत नाही. वेळोवेळी आंदोलने करूनही याची दखल घेण्यात आलेली नाही. सध्या संपूर्ण राज्यात धनगर समाज आरक्षण अंमलबजावणीसाठी शासानाच्या विरोधात तीव्र असंतोष पसरला आहे. असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या मोर्चामध्ये माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. आर. गारळे, बाळासाहेब खरात, रामदास सरगर, अशोक शेडगे यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)