शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

अनोळखी वाहनात बसणं ठरू लागलंय धोकादायक

By admin | Updated: July 4, 2014 00:25 IST

अडीअडचणीची वेळ पडतेय महागात : चार वर्षांत ४३ जणांना लुटले

सातारा : रात्री-अपरात्री एखादे वाहन मिळाले नाही की अनेक प्रवासी रस्त्यावरून धावणाऱ्या अनोळखी वाहनांना हात करून आपल्या इच्छितस्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अनोळखी वाहनात बसलेल्या चालक आणि इतर लोकांकडून धोका होऊ शकतो, हे माहीत असूनही अनेक प्रवासी अशा वाहनांत बसतात. परिणामी निर्जन ठिकाणी गाडी थांबवून अशा प्रवाशांकडून ऐवज लुटला जातो.
गेल्या चार वर्षांत सातारा जिल्ह्यात अशा प्रकारच्या ४३ घटना घडल्या असल्याची पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
वडिलांसमवेत मुंबईला निघालेल्या अल्पवयीन मुलीला एका जीपचालकाने गाडीत बसवून भुर्इंजपर्यंत नेले. त्यानंतर त्याने निर्जन ठिकाणी त्या मुलीवर अत्याचार केला. सध्या संबंधित नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, अशा प्रकारच्या वाढत्या घटना प्रवाशांसाठी चिंताजनक ठरत आहेत. यापार्श्वभूमीवर गेल्या चार वर्षांची आकडेवारी पाहिली असता तब्बल ४३ घटना घडल्या असल्याचे समोर आले. प्रवासासाठी घराबाहेर पडलेल्या व्यक्ती अनेकदा एसटीची वाट न पाहता महामार्गावर उभे राहून खासगी अनोळखी वाहनांना हात करत असतात.
अशा वेळी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला चालक व त्यामधील प्रवासी महामार्गावर उभ्या असलेल्या प्रवाशाला हेरून गाडीत घेतात. गाडी काही अंतर पुढे गेल्यानंतर निर्जन ठिकाणी गाडी थांबवून वेळ पडल्यास प्रवाशाला मारहाण करून त्याच्याकडील ऐवज लुटला जातो.
अंधार असल्यामुळे अनेकदा पीडित प्रवाशाला गाडी नंबर दिसत नसतो. त्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन असे लूटमार करणारे लोक पसार होतात. ४३ घटनांपैकी केवळ १९ घटना उघडकीस आल्या आहेत. यावरूनच असे लूटमार करणारे आरोपी कसे मोकाट आहेत, हे दिसून येते. त्यामुळे अवैध खासगी वाहतूक टाळायलाच हवी.
मंगळवारी घडलेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे महामार्गावर अवैध वाहनातून प्रवास करणे खरोखरच नागरिकांनी टाळायला हवे, हे प्रत्येकाने मनोमन पटवून घेतले पाहिजे.
कितीही घाईगडबड असली तरी एसटीनेच प्रवास करायचा, असा ठाम निर्णय घेऊनच प्रवासाठी बाहेर पडावे, असे प्रकार टाळण्यासाठी प्रवाशांनी स्वत: खबरदारी घेतली तर अशा लूटमारीच्या घटनांपासून आपण वाचू शकतो, याची जाणीव व्हायला हवी. (प्रतिनिधी)