शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पुसेगावमधील ३७३ विद्यार्थी, २३ शिक्षकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:57 IST

वडूज : नेर येथील एका कुटुंबातील कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कामुळे एका विद्यालयातील पाच विद्यार्थी बाधित सापडले. यामुळे शाळा बंद केली ...

वडूज : नेर येथील एका कुटुंबातील कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कामुळे एका विद्यालयातील पाच विद्यार्थी बाधित सापडले. यामुळे शाळा बंद केली आहे.

शाळा केव्हा सुरू करायची याबाबतचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीच्या सोमवारी होणाऱ्या बैठकीत घेण्यात येणार आहे. दरम्यान, शाळेतील ३७३ विद्यार्थी, २३ शिक्षकांची तपासणी केली.

दरम्यान, कोरोनाबाधित विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत सध्या सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांवर विश्वास न ठेवता पालकांनी मुलांच्या आरोग्याबाबत अधिक दक्षता घ्यावी, असे आवाहन शाळा प्रशासनाने केले आहे.

याबाबत माहिती अशी की, नेर येथील एका मुलीचे आजोबा बाधित असल्याचे आढळून आल्यानंतर त्या कुटुंबाची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यात या कुटुंबातील मुलगीही बाधीत आढळली. शाळा सुरू झाल्यापासून शासनाच्या निर्देशानुसार कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विद्यालयातर्फे दररोज दक्षता घेतली जाते. तरीही घरातील व्यक्तीद्वारे प्रसार झालेल्या विद्यार्थ्याच्या संपर्कात आलेल्या या शाळेतील पाच विद्यार्थी बाधित असल्याचे आढळून आले. यामध्ये नेरमधील दोन, तर पुसेगावमधील चार विद्यार्थी असल्याने शाळा त्वरित बंद केली.

संबंधित विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होत नसून त्यांची तब्येत ठणठणीत आहे.

दरम्यान, शाळेतर्फे दररोज विद्यार्थ्यांचे टेंपरेचर, ऑक्सिजन लेव्हल, पल्सेस, सॅनिटायझेशन, मास्क व एका बाकावर एक विद्यार्थी या नियमांची अंमलबजावणी करण्यात येत होती. सर्व शिक्षकांचे कोरोना तपासणीचे आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह आहेत. हे पाहूनच त्यांना शाळेत रूजू करण्यात आले आहे.

ताप, थंडी, सर्दी, खोकला यापैकी काहीही लक्षण आढळून आल्यास अशा विद्यार्थ्यांना पालकांनी शाळेत न पाठवता त्यांच्यावर त्वरित वैद्यकीय उपचार करावेत, असे आवाहन शाळा प्रशासनाने केले आहे. दरम्यान, शाळा व्यवस्थापन समितीच्या सोमवारी होणाऱ्या बैठकीत शाळा केव्हा सुरू करावयाची याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. -------