शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरमध्ये ‘चित्ररथ कोरोनामुक्तीचा’ अभिनव उपक्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:51 IST

महाबळेश्वर : महाबळेश्वर पंचायत समितीच्यावतीने ‘माझे मूल, माझी जबाबदारी’ या उपक्रमाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, कोरोनापासून लहान मुलांची काळजी कशी ...

महाबळेश्वर : महाबळेश्वर पंचायत समितीच्यावतीने ‘माझे मूल, माझी जबाबदारी’ या उपक्रमाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, कोरोनापासून लहान मुलांची काळजी कशी घ्यावी? तसेच म्युकरमायकोसिस व लसीकरण अशा कोरोना संदर्भातील विविध घटकांची माहिती देण्यासाठी ‘चित्ररथ कोरोनामुक्तीचा’ हा उपक्रम राबवण्यात आला. तसेच शिक्षकांनी माहितीपत्रक चित्ररथाद्वारे महाबळेश्वर तालुक्यातील सर्व गावागावांमध्ये जाऊन जनजागृती केली.

या उपक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, पंचायत समितीचे सभापती संजय गायकवाड,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा कृषी विकास अधिकारी, कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी नारायण घोलप, गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजित कदम यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी पंचायत समिती कर्मचारी, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी सुरेंद्र भिलारे, भाऊसाहेब दानवले चित्ररथातील सहभागी शिक्षक उपस्थित होते.

महाबळेश्वर तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे बाळासाहेब भिलारे यांनी सांगून, या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. सभापती संजय गायकवाड यांनी तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी लसीकरणावर भर देणार असल्याचे सांगितले. सलग चार दिवस तालुक्यातील सर्वच गावागावांमध्ये जाऊन जनजागृती करण्यात येत होती. या उपक्रमात केंद्रप्रमुख प्रकाश भिलारे, संभाजी जाधव, शिवाजी निकम, संतोष शिंदे, विलास जाधव, अमित कारंडे, संतोष चोरगे, संजय सोंडकर, गणेश शेंडे, पुरुषोत्तम माने, संजय संकपाळ, अशोक राऊत, राजेंद्र गायकवाड आदी शिक्षकांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या चित्ररथाची सुरुवात मेटगुताड गावापासून करण्यात आली. तालुक्यातील सर्वच गावांमध्ये जाऊन याबाबतची जनजागृती करण्यात आली.

चौकट..

स्वागतासाठी शिक्षक, अंगणवाडी, आशाताई, आरोग्य सेविका...

प्रत्येक गावांमध्ये चित्ररथाचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. चित्ररथाद्वारे पोवाडा, गाणी, पथनाट्य आदीच्या माध्यमातून वातावरणनिर्मिती करण्यात आली. त्यानंतर ‘माझे मूल, माझी जबाबदारी’ या उपक्रमांची तसेच कोरोनासंदर्भात घ्यावयाची खबरदारी, याबाबत प्रबोधन करण्यात आले. चित्ररथाच्या स्वागतासाठी गावागावामध्ये शिक्षक, अंगणवाडीताई, आशाताई, आरोग्य सेविका, ग्रामसेवक, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

१४महाबळेश्वर

महाबळेश्वर तालुक्यातील शिक्षकांनी माहितीपत्रक चित्ररथाद्वारे सर्व गावागावांमध्ये जाऊन जनजागृती केली. (छाया : जावेद खान)