शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

भरकटलेली एसटी कऱ्हाडात ताळ्यावर

By admin | Updated: August 24, 2015 23:15 IST

प्रांताधिकाऱ्यांची सूचना : स्थलांतराचा विषय थांबवा; अधिकाऱ्यांच्या बैठकीत सुरळीत वाहतुकीसाठी पोलीस उपअधीक्षकांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

कऱ्हाड : ‘येथील बसस्थानकाच्या इमारत बांधकामामुळे व्यवस्थापनाने एसटीचे चार पर्यायी बसथांबे तयार करून त्याठिकाणी एसटी थांबविण्यास सुरुवात केली. बसस्थानक व्यवस्थापनाने आपल्या सोयीसाठी कोल्हापूर नाका येथे एसटी थांबविण्याचा केलेला प्रकार प्रवाशांच्या जीवावर बेतणारा तसेच वाहतूक विस्कळीत करणारा आहे. त्यामुळे आता हा बंद करा. एसटी कऱ्हाडातील मूळ बसस्थानकात आणा. त्यासाठी नियोजन करा,’ अशी सूचना प्रांताधिकारी किशोर पवार यांनी केली. कऱ्हाड येथे शासकीय विश्रामगृहात सोमवारी बसस्थानक स्थलांतर व वाहतूक व्यवस्थेसंदर्भात शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार बाळासाहेब पाटील, प्रांताधिकारी किशोर पवार, पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, परिवहन अधिकारी स्टिव्हन अल्वारीस, तहसीलदार राजेंद्र शेळके, मुख्याधिकारी प्रशांत रोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, कनिष्ठ अभियंता फय्याज मुल्ला, अभियंता प्रियांका काशीद, विभागीय वाहतूक अधिकारी के. टी. पाटील, सहायक पोलीस निरीक्षक ए. पी. सिद, सार्वजनिक बांधकामचे ए. एम. जाधव, रस्ते विकास महामंडळाचे ए. एस. दंडवते, आगारप्रमुख जे. के. पाटील आदींसह रिक्षा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रांताधिकारी पवार म्हणाले, ‘कऱ्हाड शहरात नवीन बसस्थानक झाल्यास प्रवासी व विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. मात्र, स्थानकाच्या बांधकामास प्रारंभ झाल्यापासून बसस्थानक अधिकाऱ्यांनी प्रवासी व विद्यार्थ्यांना वाऱ्यावरच सोडले आहे. बसस्थानकात जागा असूनदेखील स्थानक शहराबाहेर हलवून व्यवस्थापनाने चुकीचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर नाका येथील राष्ट्रीय महामार्गलगत थांबा निर्माण करून प्रवाशांच्या मृत्यूस निमंत्रण देण्याचे काम एसटी प्रशासनाने केले आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पण, आता हे चालू देणार नाही. महामार्गावर एसटी थांबविण्याचा विषय कायमचा बंद करा.’ पोलीस उपअधीक्षक शिवणकर म्हणाल्या, ‘बसस्थानकाच्या स्थलांतरामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. बेशिस्त वाहतुकीवर कारवाई कधी करणार, अशी विचारणा त्यांच्याकडून केली जात आहे. बसस्थानक प्रशासनामुळे सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांनी सामान्य नागरिकांच्या प्रत्येक गोष्टींना किती दिवस तोंड द्यायचे. परिवहन अधिकारी, पोलीस अधिकारी व पालिका अधिकारी यांचे एक पथक तयार करून शहरातील बेकायदा रिक्षा थांबे, बसस्थानक परिसरातील अतिक्रमण यावर मंगळवारपासून कारवाई करणार आहे.’ यावेळी कृष्णा आॅटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष गफार नदाफ यांनी प्रशासनाचे आभार मानले. (प्रतिनिधी)