शेळकेवाडी ग्रामपंचायतीत सत्तांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:39 IST2021-01-19T04:39:14+5:302021-01-19T04:39:14+5:30

शेंद्रे : सातारा तालुक्यातील जिल्हा परिषद शेंद्रे गटातील शेळकेवाडी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तांतर होऊन जय भवानी ग्रामविकास पॅनेलने सात ...

Independence in Shelkewadi Gram Panchayat | शेळकेवाडी ग्रामपंचायतीत सत्तांतर

शेळकेवाडी ग्रामपंचायतीत सत्तांतर

शेंद्रे : सातारा तालुक्यातील जिल्हा परिषद शेंद्रे गटातील शेळकेवाडी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तांतर होऊन जय भवानी ग्रामविकास पॅनेलने सात जागांपैकी पाच जागांवर विजय मिळवत सत्तांतर घडवून आणले. या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व मानणाऱ्या जयभवानी ग्रामविकास पॅनेल व वाघेश्वरी पॅनेलमध्ये सरळ लढत झाली होती.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत जयभवानी ग्रामविकास पॅनेलमधून अनिल शेळके (१७७), शिल्पा शेळके (१७९), अश्विनी सपकाळ (१६७), अमोल राऊत (१४२), विजया शेळके यांनी (१३९) मते मिळवून विजय मिळविला; तर वाघेश्वरी विकास पॅनेलमधून माजी सरपंच संतोष शेळके (१८६) व अश्विनी शेळके हे (१९०) मते मिळवून विजयी झाले. या यशाबद्दल जयभवानी ग्रामविकास पॅनेलच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, वेदांतिकाराजे भोसले व माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले यांनी कौतुक केले.

Web Title: Independence in Shelkewadi Gram Panchayat