हमदाबाज ग्रामपंचायतीत सत्तांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:38 IST2021-01-20T04:38:25+5:302021-01-20T04:38:25+5:30

किडगाव : हमदाबाज (ता. सातारा) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हमदाबाज विकास आघाडीने ग्रामपंचायतीत सत्तांतर घडवून आणले. सातपैकी पाच जाका जिंकत विकास ...

Independence in Hamdabaj Gram Panchayat | हमदाबाज ग्रामपंचायतीत सत्तांतर

हमदाबाज ग्रामपंचायतीत सत्तांतर

किडगाव : हमदाबाज (ता. सातारा) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हमदाबाज विकास आघाडीने ग्रामपंचायतीत सत्तांतर घडवून आणले. सातपैकी पाच जाका जिंकत विकास आघाडीने यंदा ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले.

हमदाबाज ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी निवडणूक लागली होती. मात्र वॉर्ड क्रमांक एकमधून हमदाबाज विकास आघाडीच्या उमेदवार रंजना जाधव आणि दत्तात्रय संकपाळ हे उमेदवार बिनविरोध निवडून आले. उरलेल्या पाच जागांसाठी चुरशीचे मतदान झाले. त्यात हमदाबाज विकास आघाडीने तीन जागा जिंकत ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व मिळवले.

निवडणुकीत अर्चना होवाळ, छाया ढाणे, विकास साळुंखे, ज्ञानेश्वर जाधव व कल्पना वाघ हे उमेदवार विजयी झाले. हमदाबाज विकास आघाडीच्या विजयासाठी रघुनाथ साळुंखे, प्रकाश साळुंखे, व्यंकटराव ढाणे, मनोज साळुंखे, संजय ढाणे, ज्ञानदेव साळुंखे, नारायण जाधव, चंद्रकांत साळुंखे, अशोक गायकवाड, किरण गायकवाड, वैभव गायकवाड, प्रकाश ढाणे, प्रताप ढाणे, विजय ढाणे, रोहित ढाणे, धनसिंह साळुंखे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Independence in Hamdabaj Gram Panchayat