शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांवर वाढतोय राजकीय दबाव

By admin | Updated: November 16, 2015 23:41 IST

ग्रामस्थांची होते फरफट : सत्ताधाऱ्यांच्या ओझ्याखाली दबूनच करावी लागतात कामे

प्रताप बडेकर - कासेगाव --स्थानिक स्वराज्य संस्थेचा मुख्य घटक म्हणून कार्यरत असणारे ग्रामसेवक तथा अण्णासाहेब यांच्यावर राजकीय दबाव वाढत आहे. सर्वसामान्यांची कामे करण्याची इच्छा असूनही सत्ताधारी सांगतील त्याप्रमाणेच कामे करावी लागत आहेत. हे चित्र गावोगावी दिसत असून, अण्णासाहेब सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले बनत चालले आहेत.राज्याने पंचायत राज धोरण स्वीकारल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आली. त्यानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती व गावपातळीवर ग्रामपंचायत उदयास आली. या ग्रामपंचायतीसाठी दैनंदिन कामासाठी सचिव म्हणून ग्रामसेवक हे पद निर्माण केले. शासकीय पातळीवरून येणाऱ्या विविध योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत व योग्य गरजूंना त्याचा लाभ व्हावा, हे शासनाचे धोरण असते.मात्र गावपातळीवर ‘बळी तो कान पिळी’ या म्हणीप्रमाणे ज्याची गावावर सत्ता त्याच्या म्हणण्यानुसारच व तो सांगेल त्यालाच या योजनांचा लाभ, असे चित्र सर्वत्र दिसत आहे. गावपातळीवर या योजनांची माहिती लोकांना देण्याचे काम ग्रामसेवक करत असतात. या कामाच्या माध्यमातून गावातील लोकांचा त्यांच्याशी संपर्क असतो. मात्र सात्ताधारी आपल्या राजकीय स्वार्थासाठी आपल्या मर्जीतल्या लोकांचीच यासाठी निवड करताना दिसत आहेत. त्यामुळे इच्छा असूनही अण्णासाहेबांना सत्ताधाऱ्यांपुढे जाता येत नाही. तसेच मासिक सभा, ग्रामसभा आदी सभांचे प्रोसेडिंग व त्यातील ठराव याबाबतही त्यांना सत्ताधाऱ्यांचेच ऐकावे लागते.वास्तविक शासन स्तरावरून येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांचा गरजूंना फायदा होणे गरजेचे असताना गावोगावचे अण्णासाहेब मात्र इच्छा असूनही कामे करू शकत नाहीत. त्यामुळे हे अण्णासाहेब सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. याला कुठे तरी आळा बसण्याची गरज आहे. अन्यथा ग्रामीण विकासाला त्याचा फटका बसेल.अधिकाऱ्यांवर मर्यादा..!काही ग्रामसेवक मोठ्या तडफेने व प्रामाणिकपणे कामे करतात. यामुळे काही वेळेस सत्ताधारी गट व ग्रामसेवकांत संघर्ष होतो. यातूनच सत्ताधारी संबंधित ग्रामसेवकाची बदली अथवा त्याला बडतर्फ करण्यासाठी व्यूहरचना आखतात, अशी उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही मर्यादा येत आहेत.