प्लास्टिक वापरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:12 IST2021-02-21T05:12:40+5:302021-02-21T05:12:40+5:30

वाहतुकीची कोंडी सातारा : शहरातील काही अंतर्गत रस्ते अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. साताऱ्यातील शाहू चौक ते ...

Increase in plastic consumption | प्लास्टिक वापरात वाढ

प्लास्टिक वापरात वाढ

वाहतुकीची कोंडी

सातारा : शहरातील काही अंतर्गत रस्ते अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. साताऱ्यातील शाहू चौक ते बोगदा हा रस्ता अरुंद आहे. या मार्गावरून कास, बामणोली, परळी, सज्जनगड या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्यातच या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नागरी वस्ती असल्याने स्थानिक रहिवाशांची वाहने रस्त्याकडेला पार्क करतात.

व्यावसायिकांची हानी

सातारा : जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिकांचे अर्थचक्र बनलेल्या व हजारो मजुरांच्या चुली पेटविणारा वीटभट्टीचा व्यवसाय अवकाळी पावसाने पुन्हा मातीत गेल्याने त्यावर आधारित हजारोंचे जीवन संकटात आले आहे. पावसाने वीटभट्टी व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे.

एसटी सेवा पूर्ववत

सातारा : कोरोना महामारी कमी झाल्याने कॉलेज, महाविद्यालये पूर्ववत सुरू होत आहेत. विद्यार्थी तसेच प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

ज्वारीचे नुकसान

खटाव : मोळसह खटाव परिसरात गुरुवारी पावसाने दमदार हजेरी लावली. या जोरदार पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ज्वारी जमीनदोस्त झाली. हरभऱ्यासह इतर पिकांचे नुकसान झाले.

कोबी झाली स्वस्त

सातारा : कमी कालावधीत जादा पैसा मिळतात, या आशेवर अलीकडे शेतकरी भाजीपाल्याच्या, पालेभाज्यांच्या पिकांकडे वळले आहेत. सध्या बाजारपेठेत भाज्यांचे दर गडगडले आहेत. त्यात कोबीचा दर तर एक रुपया किलोवर आला आहे. त्यामुळे कोबी उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडल्यासारखी स्थिती झाली आहे.

रक्तदान शिबिर

सातारा : निवृत्त अभियंता मंडळ आणि कृष्णानगर येथील बी द चेंज ग्रुपच्या वतीने पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या ४० जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ निवृत्त अभियंता मंडळाच्या सभागृहात आयोजित शिबिरात ४१ युवकांनी रक्तदान केल्याची माहिती संयोजकांकडून देण्यात आली.

बसमध्ये शिवजयंती

सातारा : एसटीच्या संभाजीनगर आगाराच्या चालक बाळासाहेब कांबळे यांनी शुक्रवारी महाबळेश्वर- कोल्हापूर या मार्गावर कार्यरत असताना एसटी बसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावून शिवजयंती साजरी केली. यावेळी प्रवाशांनी हजेरी लावून अभिवादन केले.

साताऱ्यात सहा ठिकाणी सुलभ शाैचालय

सातारा : सार्वजनिक शौचालये आणि स्वच्छतागृहांअभावी होणारी सातारकरांची कुचंबणा दूर करण्यासाठी सातारा पालिकेने पुढाकार घेतला आहे. पालिकेने शहराच्या विविध भागांमध्ये सहा ठिकाणी ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ अर्थात ‘बीओटी’ तत्त्वावर सुलभ शौचालयेे आणि स्वच्छतागृहे अभारण्याचा आराखडा तयार केला असून, त्या कामांना येत्या काही दिवसांत सुरुवात होणार आहे. मारवाडी चौक, देवी चौक तसेच इतर भागात महिला आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृहे होती. मात्र, ते पाडण्यात आले.

Web Title: Increase in plastic consumption