शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना शासकीय आशीर्वाद; ४८ लाखांचा निधी उपलब्ध 

By नितीन काळेल | Updated: April 3, 2024 19:34 IST

सातारा : समाजातील जाती-भेदाच्या भिंती दूर होण्यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचे अर्थसहाय करण्यात येते. मात्र, ...

सातारा : समाजातील जाती-भेदाच्या भिंती दूर होण्यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचे अर्थसहाय करण्यात येते. मात्र, शासनाकडून निधी वेळेत मिळत नसल्याने लाभ लवकर मिळत नाही. पण, नुकताच ४८ लाखांचा निधी मंजूर झाला असून यातून ९६ प्रेमींना लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत माहिती अशी की, समाजात अनेक चालीरीती आहेत. तसेच विविध जाती आहेत. समाजातील जाती-पातीच्या भिंती दूर करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येतात. यासाठी शासनाचेही आर्थिक बळ मिळते. त्यामुळे आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या हिश्श्यातून ५० हजार रुपयांचे अर्थसहाय करण्यात येते. यामध्ये दोघांचाही हिस्सा प्रत्येकी ५० टक्के असतो.

जिल्हास्तरावरून ही मदत करण्यात येते. यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे प्रस्ताव दाखल करावा लागतो. त्यानंतर दाम्पत्यांना अर्थसहाय करण्यात येते. मात्र, शासनाकडून निधी वेळेवर मिळत नाही. त्यामुळे प्रस्ताव दाखल करणाऱ्यांना सतत विचारणा करावी लागते. तसेच हेलपाटे मारण्याची वेळ येते. तर सातारा जिल्ह्यात आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यांनी लाभासाठी अर्ज केले होते. त्यातील ९६ दाम्पत्यांना लाभ मिळणार आहे. यासाठी ४८ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झालेले आहे. याबाबत लवकरच विविध प्रक्रिया पार पाडून जून महिन्यापर्यंत संबंधितांना योजनेचा लाभ देण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे.

योजनेचा लाभ यांना मिळतो..आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्याला प्रोत्साहनपर अर्थसहाय करण्यात येते. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जाती, जमाती या संवर्गातील एक आणि सवर्ण हिंदू, जैन, लिंगायत, बौद्ध, शीख यापैकी दुसरी व्यक्ती यांनी विवाह केल्यास ते योजनेस पात्र ठरतात. तर २००४ पासून मागासवर्गीय अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती या आंतरप्रवर्गातील विवाहितांनाही याचा लाभ मिळत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmarriageलग्नGovernmentसरकार