शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

उद्घाटन नव्याचे; पण कामकाज जुन्यातच

By admin | Updated: July 22, 2014 22:12 IST

पाटण पंचायत समिती : पशुवैद्यकीय दवाखान्यावरून पुन्हा जुंपणार !

पाटण : पंचायत समितीच्या अखत्यारित येणाऱ्या पाटण येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नव्या इमारतीचे उद्घाटन सभापतींना डावलून राष्ट्रवादीने उरकले़ त्यावरुन सभापतींचे पती व बांधकाम शाखा अभियंत्यांमध्ये मोठे ‘रामायण’ घडले़ परस्परविरोधी तक्रारीही पोलिसात गेल्या़ या घटनेला वीस दिवस होवून गेले तरीही त्या दवाखान्याचे कामकाज जुन्या इमारतीतच सूरू असून उद्घाटन झालेली नवीन इमारत केवळ शोपीस बनून राहिली आहे़ पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये याच विषयावरून देसाई - पाटणकर गटात जोरदार खडाजंगी होणार असल्याची चिन्हे आहेत़ बुधवारी ही सभा होणार असून सभेमध्ये पशुवैद्यकीय दवाखाना उद्घाटनावरुन संबंधित अधिकारी व राष्ट्रवादिचे सदस्य यांना सत्ताधारी देसाई गट जाब विचारण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात सभापतींसह देसाई गटाच्या सदस्यांनी तयारीही केली आहे़ सभापती वनिता कारंडे यांचे पती नरायण कारंडे यांनी ‘बुटाने मारण्याची’ भाषा वापरली हा धागा पकडून राष्ट्रवादीचे सदस्य आगपाखड करण्याची शक्यता आहे. त्यामुळे होणाऱ्या मासिक सभेला आखाडयाचे स्वरुप प्राप्त होणार आहे़ बांधकाम विभागाचा लेखाजोखा व या विभागाने केलेली रस्त्यांची कामे व अन्य कामांचा आढावा सभेत घेतला जाणार असल्यामुळे अधिकाऱ्यांनाही तयारी करूनच सभेस यावे लागणार आहे. (प्रतिनिधी)