कास रस्त्यावर तोतया पोलीस ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 13:13 IST2019-11-04T13:11:56+5:302019-11-04T13:13:33+5:30

कास रस्त्यावर संशयितरित्या उभ्या राहणाऱ्या तोतया पोलिसाला सातारा तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले.

Impersonation of police in Kas street | कास रस्त्यावर तोतया पोलीस ताब्यात

कास रस्त्यावर तोतया पोलीस ताब्यात

ठळक मुद्देकास रस्त्यावर तोतया पोलीस ताब्यातसातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद

सातारा : कास रस्त्यावर संशयितरित्या उभ्या राहणाऱ्या तोतया पोलिसाला सातारा तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले.

विकास बाबासो चोरगे (वय २१, सायळी, पोस्ट कोपर्डे, ता. कºहाड) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, विकास चोरगे हा वाहतूक पोलिसाच्या गणवेशात कास रस्त्यारील देवकल फाटा येथे उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन चोरगेला ताब्यात घेतले.

पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने परिधान केलेला पोलिसाचा गणवेश बोगस असल्याचे समोर आले. चोरगे हा कोणत्याही पोलीस ठाण्यात नोकरीस नसताना त्याने पोलिसाचा गणवेश परिधान करून तोतयागिरी केल्याचे हवालदार रमेश शिखरे यांनी फिर्यादित म्हटले आहे.

विकास चोरगेला पोलिसांनी सोडून दिले असून, त्याला नोटीस बजावण्यात आली आहे. त्याने कोणत्या हेतून पोलिसांचा गणेश परिधान केला होता, हे पोलिसांच्या तपासात अद्याप समोर आले नाही. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

Web Title: Impersonation of police in Kas street