शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गौणखनिज उत्खनन करणाऱ्यांना ‘महसूल’चा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:35 IST

कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावरील मानेगावनजीक मुरुम आणि डबर उत्खनन होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. त्यानंतर स्वत: तहसीलदार योगेश्वर टोम्पे आणि ...

कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावरील मानेगावनजीक मुरुम आणि डबर उत्खनन होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. त्यानंतर स्वत: तहसीलदार योगेश्वर टोम्पे आणि त्यांच्या टीमने शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी डबर भरलेला एक डंपर तेथून चालला असतानाच त्याला डबरसह ताब्यात घेण्यात आले. तर उत्खनन होत असलेल्या ठिकाणी अन्य तीन डंपर, एक पोकलॅण्ड, एक ब्लास्टिंग करणारा ट्रॅक्टर अशी पाच वाहने सील करण्यात आली आहेत.

दरम्यान, संबंधित उत्खनन करणाऱ्या व्यक्तीकडे उत्खनन करण्याचा आणि रॉयल्टी भरल्याचा कोणताही वैध पुरावा आढळून आला नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली असून, संबंधितांकडून खुलासा मागविण्यात आला आहे. त्यानंतर आतापर्यंत किती उत्खनन केले आणि शासकीय नियमानुसार किती रॉयल्टी भरली, याची चौकशी करून त्यानंतर दंडात्मक कारवाई होईल, असे तहसीलदार योगेश्वर टोम्पे यांनी सांगितले. या कारवाईत मंडल अधिकारी प्रवीण शिंदे, तलाठी एस. एस. काशीद, विजय महापुरे आदींनी सहभाग घेतला.

फोटो : २१केआरडी०४

कॅप्शन : मानेगाव, ता. पाटण येथे बेकायदा गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी महसूल विभागाने कारवाई करून वाहने जागीच सील केली आहेत.