शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक घरातील माता गीतेतील आदर्श

By admin | Updated: September 22, 2014 00:47 IST

रमणलाल शहा : पाचगणी येथे महाश्वेता जैन संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन उत्साहात

सातारा : भगवान महावीरांसारखे निर्भय कोणी नव्हते. भगवानांची समता कधीही ढळली नाही. जैन धर्म हा सर्वात प्राचीन धर्म आहे, असे लोकमान्य टिळकांनी सांगितले आहे. आजची प्रत्येक घरातील माता ही गीतेतील आदर्श आहे. लोकांना काहीतरी देण्यातच खरा आनंद आहे, असे उद्गार ज्येष्ठ भविष्यतज्ज्ञ आणि वराह मिहीर ज्योतिष विद्यापीठाचे कुलगुरु प्राचार्य रमणलाल शहा यांनी काढले. पाचगणी येथे झालेल्या दोन दिवसीय महाश्वेता जैन संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात अध्यक्षस्थावरुन ते बोलत होते. या अधिवेशनाचे उद्घाटक पुणे येथील ज्येष्ठ उद्योजक मोहनलाल पालेशा होते. तसेच यावेळी संघटनेचे प्रदीप पारेख, धरमचंद शहा, उद्योजक भरतशेठ मेहता, सुभाष शहा, ललीत गांधी, जवाहरभाई शहा, तेजपाल शहा यांची उपस्थिती होतीप्रारंभी भरतशेठ मेहता यांनी भगवान महावीरांचे प्र्रतिमा पूजन केले. त्यानंतर नवकार मंत्रपठण व ध्वजारोहण करण्यात आले. प्रा. रमणलाल शहा म्हणाले की, आपण मंदिरात का जातो? मंदिरात जाणे म्हणजे मनाला स्वच्छ करणे. भक्ती ही मनाची उत्कटता आहे. तर सुख हे आपल्या समाधानात आहे. मोहनलाल पालेशा म्हणाले की, आजच्या काळात उपलब्ध संधीचा योग्य उपयोग युवकांनी केला पाहीजे. आज एकत्र कुटुंबपद्धती नामशेष होत आहे. मात्र खरी गरज ही एकत्र येण्याचीच आहे. विभक्त कुटुंब पध्दतीमुळे संवेदना कमी होत आहेत. (प्रतिनिधी)