शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

भुकेने व्याकूळ कोल्ह्याचा अखेर मृत्यू !

By admin | Updated: April 4, 2015 00:03 IST

वनकार्यालयात अखेरचा श्वास : उपासमार, शरीरातील पाणी कमी झाल्याचा परिणाम, आगाशिव डोंगरात अंत्यसंस्कार

कऱ्हाड : करवडी कॉलनीत बेशुद्धावस्थेत आढळून आलेला कोल्हा भुकेचा बळी ठरला. गुरुवारी सकाळी त्याच्यावर कऱ्हाडच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्याला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. आगाशिवनगर येथे वनकार्यालयात उपचार सुरू असताना रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. शरीरातील पाणी कमी झाल्याने कोल्ह्याला प्राण गमवावे लागले.करवडी कॉलनी येथील भारमल यांच्या घरासमोर गुरुवारी सकाळी अचानक कोल्हा आढळून आला. भारमल यांच्या घरापासून काही अंतरावर उसाचे शेत आहे. या शेतातून तो बाहेर पडला असावा, असा वनविभागाचा अंदाज आहे. घरासमोर अचानक कोल्हा आल्याचे निदर्शनास आल्यानंतर परिसरातील नागरिक घाबरले. मात्र, नागरिकांनी काही हालचाल करण्यापूर्वीच तो कोल्हा जमिनीवर कोसळला. नागरिकांनी याबाबतची माहिती सर्पमित्र सलीम मुल्ला आणि विनायक दळवी यांना दिली. त्यांनी अ‍ॅनिमल वेलफेअर आॅफिसर अमोल शिंदे यांना याबाबत कळविल्यानंतर अमोल शिंदे तातडीने त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी बेशुद्धावस्थेत पडलेल्या कोल्ह्याला इलेक्ट्रॉल पावडर पाजली. काही वेळानंतर शुद्धीवर आलेल्या कोल्ह्याला घेऊन अ‍ॅनिमल आॅफिसर शिंदे यांच्यासह काही नागरिक कऱ्हाडच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात आले. त्याठिकाणी डॉ. बोरडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी कोल्ह्यावर उपचार केले. उपचारानंतर त्याला वनाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. ताब्यात घेतलेला कोल्हा घेऊन वनाधिकारी आगाशिवनगर येथील कार्यालयात गेले. त्याठिकाणी कोल्ह्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, उपचार करूनही त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्याच्यासमोर टाकलेले मांसाचे तुकडेही कोल्ह्याने खाल्ले नाहीत. रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर वन कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस मृत कोल्ह्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी) संबंधित कोल्हा गत काही दिवसांपासून उपाशी होता. त्यातच त्याच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झालेली. त्याचे शरीर उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. त्याला दुसरा कोणता आजार नसल्याचे प्राथमिक तपासणीत स्पष्ट झाले आहे. मात्र, शरीराच्या अंतर्गत भागात एखादी जखम झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.- भरत पाटील, वनाधिकारी, कऱ्हाडवनविभागाकडून पंचनामामृत कोल्ह्याचा वनविभागाकडून पंचनामा करण्यात आला. त्याचे वय सुमारे दोन वर्षे असून, उंची दीड फूट तर लांबी अडीच फूट असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. मुख्यत: कोल्ह्याची नर, मादी आणि पिले एकत्र राहतात. त्यांचे वावरक्षेत्र निश्चित असते. तसेच शहर किंवा खेडेगावाच्या आसपास राहणे या प्राण्याला पसंत पडते, असे वनाधिकाऱ्यांचे मत आहे. वनविभागाकडून पंचनामामृत कोल्ह्याचा वनविभागाकडून पंचनामा करण्यात आला. त्याचे वय सुमारे दोन वर्षे असून, उंची दीड फूट तर लांबी अडीच फूट असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. मुख्यत: कोल्ह्याची नर, मादी आणि पिले एकत्र राहतात. त्यांचे वावरक्षेत्र निश्चित असते. तसेच शहर किंवा खेडेगावाच्या आसपास राहणे या प्राण्याला पसंत पडते, असे वनाधिकाऱ्यांचे मत आहे.