शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

सातारच्या शाहूपुरीत भरदिवसा साडेचार लाखांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 4:32 PM

सातारा येथील शाहूपुरीमध्ये रविवारी भरदुपारी घराच्या सेफ्टी दरवाजाची कडी काढून अज्ञाताने सुमारे २० तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि ३० हजार रुपयांची रोकड लंपास केली. या चोरीत सुमारे साडेचार लाखांचा ऐवज गेला असून, पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा नोंद केला आहे.

ठळक मुद्दे३० हजारांची रोकड. अज्ञातावर गुन्हा नोंदसोन्याचे २० तोळ्यांचे दागिने लंपास;

सातारा : येथील शाहूपुरीमध्ये रविवारी भरदुपारी घराच्या सेफ्टी दरवाजाची कडी काढून अज्ञाताने सुमारे २० तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि ३० हजार रुपयांची रोकड लंपास केली. या चोरीत सुमारे साडेचार लाखांचा ऐवज गेला असून, पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा नोंद केला आहे.याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कामिनी राजीव पाटील (वय ४५, रा. सिद्धीविनायक हौसिंग सोसायटी, शाहूपुरी) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार रविवारी दुपारच्या सुमारास पाटील या बाहेर गेल्या होत्या.

त्यावेळी घराच्या पाठीमागील बाजूच्या सेफ्टी दरवाजाची कडी काढून अज्ञाताने आत प्रवेश केला. अज्ञाताने घरातून सोन्या, चांदीचे दागिने आणि ३० हजार रुपयांची रोकड लंपास केली.

सोन्याच्या दागिन्यामध्ये बारा, आठ आणि एक तोळे वजनाचे गंठण, सव्वा तोळ्याच्या अंगठ्या, एक तोळ्याची दोन वेडणी, रिंग, फुलांची जोडी, झुबे तसेच चांदीची १५ नाणी, तीन राशी रत्ने व कॅमेरा नेण्यात आला.

घटनास्थळी श्वानपथक गेले होते. या पथकाने चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तसेच ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा चोरीची नोंद झाली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrimeगुन्हा