ठळक मुद्देशाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद गर्दीचा फायदा घेत केली रोकड लंपास

सातारा ,दि.  ०६ : येथील खणआळी परिसरात खरेदीसाठी आल्यानंतर पर्समधून सुमारे एक लाखाचा ऐवज अज्ञाताने चोरून नेला. यामध्ये सोन्याच्या दागिन्यांसह रोकडचा समावेश आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी उषा रत्नकांत ढेब (वय ५७, रा. कृष्णानगर, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, रविवारी सायंकाळच्या सुमारास ढेब या खणआळी परिसरात खरेदीसाठी आल्या होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञाताने त्यांच्या पर्समधून सोन्याचे अडीच तोळे वजनाचे मंगळसूत्र, दीड तोळ्याचा लक्ष्मीहार आणि सहा हजार रुपयांची रोकड लंपास केली.

याची किंमत एक लाख ४ हजार रुपये आहे. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर ढेब यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रारी दिली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, पोलिस उपनिरीक्षक अशोक ससाणे हे तपास करीत आहेत.