शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

एवढी घाण पाच वर्षांत कशी साफ होणार?

By admin | Updated: June 11, 2015 00:25 IST

अविनाश मोहिते : ‘कृष्णे’च्या ताकारी-बळे येथील प्रचारसभेत विरोधकांचा घेतला समाचार

कऱ्हाड : ‘संस्थापक पॅनेलची सत्ता आल्यानंतर सर्वसामान्य शेतकऱ्यांना चांगली वागणूक दिली. सभासद कोणत्या गटाचा किंवा पक्षाचा आहे, याचा विचार केला नाही. शेतकरी सभासद हाच कारखान्याचा मालक असल्याची भावना जपली; परंतु मोहिते-भोसले हे माझ्यावर व कारखान्यावर टीका करीत आहेत. कारखान्याच्या स्थापनेपासून सत्ता यांच्याच घरात आलटून पालटून जास्तवेळ होती. मग या ५० वर्षांची घाण पाच वर्षांत मी कशी साफ करणार,’ असा टोला यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी लगावला. ताकारी-बहे, ता. वाळवा येथे संस्थापक पॅनेलच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. कामगार पक्षाचे नेते अ‍ॅड. रवींद्र पवार, शेतीमित्र अशोकराव थोरात, कारखान्याचे उपाध्यक्ष सुरेश पाटील उपस्थित होते.अविनाश मोहिते म्हणाले, ‘विरोधकांच्या ताब्यात कारखाना होता, त्यावेळी त्यांचा कारभार कसा होता, हे आपण जाणता. कारखाना जेव्हा २०१० मध्ये संस्थापक पॅनेलच्या ताब्यात आला, तेव्हा तो कर्ज मुक्त होता का? त्यांनी केलेल्या कर्जाची परतफेड आम्ही केली. १०० रुपये बिल बुडविणारे, १० रुपये फायनल बिल काढणारे, १ रुपये दुखवट्याचे बिल देणाऱ्यांना आपण पुन्हा सत्ता द्यायची का? यांच्या घरगुती भांडणात सभासद भरडला गेला. घराघरात भांडणे लागली. ही मंडळी स्वार्थासाठी कधी एक होणार, कधी बाजूला जाणार, हा त्यांचा घरगुती विषय आहे. नेहमी हे म्हणतील तेव्हा सभासदांनी यांच्या पाठीमागून जायचे का? ही निवडणूक सभासदांच्या मानसन्मानाची आहे.’ असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)