वाई येथे शहीद नातेवाईक व जवानांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:39 IST2021-04-01T04:39:33+5:302021-04-01T04:39:33+5:30

वाई : वाई येथे शहीद दिवस हा हुतात्मा, स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणाचा दिवस. या दिवसाच्या निमित्ताने जय हिंद ...

Honoring the relatives and soldiers of the martyrs at Wai | वाई येथे शहीद नातेवाईक व जवानांचा सन्मान

वाई येथे शहीद नातेवाईक व जवानांचा सन्मान

वाई : वाई येथे शहीद दिवस हा हुतात्मा, स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणाचा दिवस. या दिवसाच्या निमित्ताने जय हिंद फाैंडेशन वाई यांनी हुतात्मा जवान गणेश ढवळे यांचा परिवार आणि सध्या देशसेवा बजावत असलेले जवान यांचा सन्मान सोहळा वाई येथे आयोजित केला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शैलेंद्र धेडे, डॉ. पुष्कराज भोसले उपस्थित होते.

जवान गणेश ढवळे यांचे वीरपिता, तसेच कार्यरत जवान अजित डेरे, युवराज झांजुर्णे, गोळे यांचा प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. तसेच गेली तीन वर्षे दुकानावर येणारे जवान व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मोफत रस देणारे शहाबाग वाई येथील रसवंतीगृह चालक-मालक जमदाडे पती-पत्नीचाही सन्मान करण्यात आला.

यावेळी जयहिंद फाैंडेशनच्या नवीन वाई तालुका कार्यकारिणीस नियुक्तीपत्रे देण्यात आली. यामध्ये खजिनदारपदी सचिन कांबळे, सूरज शिंदे, तसेच वाई तालुका महिला प्रमुखपदी सुनीता जमदाडे यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित जवानांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे वाई तालुका सचिव रमजान पुणेकर यांनी सूत्रसंचालन केले. वाई तालुकाध्यक्ष वैभव कदम यांनी आभार मानले.

Web Title: Honoring the relatives and soldiers of the martyrs at Wai