शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनरची मालट्रकला धडक; दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:47 IST

विश्वनाथन जगन्नाथन (वय ३३, रा. वेलामपट्टी, अथूर-तामिळनाडू) व सुब्बराम सिरंगराम आर (वय ३६, रा. विसू वसापुरम, आम्मापट्टी, तामिळनाडू) अशी ...

विश्वनाथन जगन्नाथन (वय ३३, रा. वेलामपट्टी, अथूर-तामिळनाडू) व सुब्बराम सिरंगराम आर (वय ३६, रा. विसू वसापुरम, आम्मापट्टी, तामिळनाडू) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेला मालट्रक (क्र. केएल ०८ बीक्यू ४०३०) रविवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास खोडशी गावच्या हद्दीतील हॉटेल अरोमासमोर थांबला होता. त्यावेळी पाठीमागून आलेल्या कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे कंटेनरची (क्र. टीएन ६० एझेड ०८७१) मालट्रकला जोराची धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की, कंटेनरमधील चालक आणि क्लिनर जखमी अवस्थेत केबिनमध्ये अडकून पडले होते.

अपघाताची माहिती मिळताच कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यातील हवालदार प्रशांत जाधव हे कर्मचाऱ्यांसह तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी जखमींना कंटेनरच्या केबिनमधून बाहेर काढून उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच त्या दोघांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, महामार्गावर रात्रीच्या वेळी अंधारात मालट्रक उभा करून प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी मालट्रकचा चालक ए. के. सुनीलन (वय ५१, रा. आतीकवील हाऊस, ता. पुमंगलम, केरळ) याच्यावर कऱ्हाड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हवालदार प्रशांत जाधव यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.