शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील प्रवेशद्वारावर उभारणार इतिहास जागविणाऱ्या कमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:54 IST

सातारा : सातारा शहराला ऐतिहासिक वारसा लाभला असून, हा वारसा जतन करणे गरजेचे आहे. यासाठी शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे सुशोभीकरण ...

सातारा : सातारा शहराला ऐतिहासिक वारसा लाभला असून, हा वारसा जतन करणे गरजेचे आहे. यासाठी शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे सुशोभीकरण करण्यासाठी शहराला जोडणाऱ्या प्रमुख प्रवेशद्वारांवर भव्य-दिव्य कमानी उभारण्याचे पालिका प्रशासनाचे नियोजन आहे. या कमानी शहराच्या वैभवात भर घालण्याबरोबरच इतिहास जागविण्याचे काम करतील, असा विश्वास पालिकेत झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी अकरा वाजता नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीत कल्पनाराजे यांनी विविध विकासकामांचा आढावा जाणून घेतला. यावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, बांधकाम सभापती सिद्धी पवार, रजनी जेधे, संगीता आवळे आदी उपस्थित होते.

राजमाता कल्पनाराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले यांच्या संकल्पनेतून सातारा शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे सुशोभीकरण केले जाणार आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी नाशिकहून आलेले फायबर वर्क एक्सपर्ट संजीव खत्री यांच्या शिष्टमंडळाने नियोजित कामांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा केली. ऐतिहासिक वास्तू कशी असावी, त्याच्या सुशोभीकरणासाठी वापरले जाणारे साहित्य कसे असावे, याचे सादरीकरण संगणाकाद्वारे करण्यात आले. सुशोभीकरण अ‍ॅडव्हान्स फायबर वर्कमध्ये असणार आहे. हे साहित्य अत्यंत टिकाऊ, मजबूत असते. त्यावर हवामान, पाऊस व पाण्याचा कोणताही परिणाम होत नसल्याचे संजीव खत्री यांनी सांगितले.

दरम्यान, शहराला जोडणाऱ्या प्रमुख प्रवेशद्वारांवर भव्य-दिव्य व इतिहास जागविणाऱ्या कमानी उभारणार असल्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्यानंंतर शहरातील गोल बाग, कमानी हौद, ग्रेड सेपरेटर, पोवई नाका शिवतीर्थ, सातारा पालिकेची नियोजित प्रशासकीय इमारत, गोडोली तळे आदींची कल्पनाराजे भोसले यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली. यावेळी नगरसेवक किशोर शिंदे, मुख्याधिकारी अभिजित बापट, नगर अभियंता दिलीप चिद्रे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

फोटो : २५ पालिका बैठक

सातारा पालिकेत गुरुवारी राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील ऐतिहासिक वास्तू कशा असाव्यात, याचे सादरीकरण करण्यात आले.