शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणेच्या स्फोटात तीन कोटींची हानी

By admin | Updated: February 8, 2015 00:53 IST

पालकमंत्र्यांची घटनास्थळी भेट

वडूज : हिंगणे, ता. खटाव येथील खटाव-माण अ‍ॅग्रो प्रोसेसिंग या इथेनॉल प्रकल्पाला शुक्रवार, दि. ६ रोजी लागलेली आग आटोक्यात आणण्यात अखेर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास यश आले. या आगीत प्रकल्पाची मशिनरी व बायोडिझेलचे तयार झालेले उत्पादन अशी सुमारे तीन कोटींची हानी झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी पालकमंत्री विजय शिवतारे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास प्रकल्पावरील एका साठवण टाकीच्या झाकण दुरुस्तीचे किरकोळ काम सुरू असताना अचानकपणे स्फोट झाला. या स्फोटात सागर कृष्णात जगदाळे (रा. राजाचे कुर्ले, ता. खटाव) हा युवक कामगार जागीच झाला. कऱ्हाड, फलटण, म्हसवड, विटा, केन अ‍ॅग्रो साखर कारखाना येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र, पाण्याच्या फवाऱ्याने आग अधिकच भडकत होती. त्यानंतर कोल्हापूर, सांगली- मिरज महानगरपालिका व नीरा, बारामती येथील नगरपालिकांच्या अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या गाड्यांनी फोमचा वापर करीत रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आणली. या आगीत प्रकल्पातील सात साठवण टाक्या निकामी होण्याबरोबरच साठ हजार लिटर तयार बायोडिझेल भस्मसात झाले. तर साडेसात एचपी व पाच एचपीच्या चार मोटारी जळून खाक झाल्या. तसेच एक लाख वीस हजार लिटर अ‍ॅसिड आईल ही जळून संपुष्टात आले. त्यामुळे अंदाजे तीन कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रात्री उशिरा आग आटोक्यात आल्यामुळे मोठी वित्तहानी टळण्याबरोबरच परिसरातील हिंगणे, तडवळे, मांडवे, रानमळा येथील लोकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. आगीमुळे झालेल्या नुकसानीचा आज (शनिवारी) पंचनामा करण्याचे काम सुरू होते. सकाळी पालकमंत्री विजय शिवतारे, जिल्हाधिकारी मुदगल यांनी घटनास्थळास भेट देऊन कशामुळे स्फोट झाला, याबाबतची माहितीही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसेनेचे रणजितसिंह देशमुख, प्रकल्पाचे संचालक धैर्यशील कदम, सुनीलशेठ झंवर, सुहास राजमाने, सुनील खाडे, तानाजी पवार,रणजित जाधव आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)