शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस जोर धरू लागला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरणक्षेत्रात पुन्हा पाऊस सुरू झाला असून, जोर धरू लागला आहे. कोयनेत प्रथमच आवक ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरणक्षेत्रात पुन्हा पाऊस सुरू झाला असून, जोर धरू लागला आहे. कोयनेत प्रथमच आवक होऊ लागली आहे. तर साताऱ्यात रिमझिम स्वरूपात पाऊस होत असून पूर्वेकडील बहुतांशी भागांत ढगाळ वातावरण होते.

जिल्ह्यात या वर्षी वेळेच्या अगोदर माॅन्सूनचा पाऊस सुरू झाला. सुरुवातीला काही दिवस पश्चिम भागात चांगला पाऊस झाला. त्यानंतर पावसाने उघडीप दिली. त्यानंतर मंगळवारी सायंकाळपासून पश्चिम भागात पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. विशेष करून धरण क्षेत्रात पाऊस चांगला पडत आहे. यामुळे सध्यस्थितीत तरी कोयना धरणात पाण्याची आवक सुरू झालेली आहे. सकाळच्या सुमारास धरणात ३०७८ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर इतर प्रमुख धरणांत अजून आवक सुरू झालेली नाही.

त्याचबरोबर सातारा शहरात मंगळवारी सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली. रिमझिम स्वरूपात पाऊस होत आहे. बुधवारीही पाऊस झाला. यामुळे नागरिकांना छत्री, रेनकोट घेऊनच बाहेर पडावे लागत होते.

पूर्व भागात काही भागांत रिमझिम पाऊस झाला. पण, बहुतांशी भागांत दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुष्काळी भागात खरीप हंगाम पेरणीसाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. सध्या पेरण्या रखडल्या आहेत.

चौकट :

कोयनेला ५३ मिलिमीटर पाऊस...

पश्चिम भागातील धरण परिसरात पाऊस सुरू आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे सर्वाधिक ५३ मिलिमीटर पाऊस झाला. तर आतापर्यंत ऐकूण १९२ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर कण्हेरला ३१ तर एकूण ८९ मिलिमीटर पाऊस झाला. धोमला १९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जूनपासून धोम धरण परिसरात ७२ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. बलकवडीला बुधवारी सकाळपर्यंत ३६ मिलिमीटर पाऊस झाला. तर आतापर्यंत १०१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्याचबरोबर तारळीला २५ आणि जूनपासून ९५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. खटाव तालुक्यातील येरळा धरण परिसरात अवघ्या ३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

.......................................................