शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

जोरदार पावसामुळे म्हसवडमध्ये पुरातन मंदिर ढासळले; एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:47 IST

सातारा : जोरदार पाऊस आल्याने आडोशाला उभ्या राहिलेल्या चार कामगारांच्या अंगावर पुरातन मंदिर कोसळल्याने परभणी जिल्ह्यातील एका कामगाराचा मृत्यू ...

सातारा : जोरदार पाऊस आल्याने आडोशाला उभ्या राहिलेल्या चार कामगारांच्या अंगावर पुरातन मंदिर कोसळल्याने परभणी जिल्ह्यातील एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना माण तालुक्यातील म्हसवड शेजारील वीरकरवाडीमध्ये सोमवारी दुपारी चार वाजता घडली.

वेंकट बिराजी दणकटवड (वय ६५, रा. तांदूळवाडी, ता. पालम, जि. परभणी) असे मंदिराखाली सापडून मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वीरकरवाडी येथे मायाक्काचे नवीन मंदिर बांधण्याचे काम सुरू आहे. याच मंदिराच्या शेजारी पुरातन मायाक्काचे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम सुर असताना सोमवारी दुपारी साडेचारच्यासुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. मंदिराच्या बांधकामावर काम करणारे आठ कामगार नजिकच जुने मायाक्का देवीच्या मंदिराच्या आडोशाला गेले. जुने असलेले मायाक्काचे मंदिर हे शहाबाद फरशीचे गरडेल असलेले अचानक कोसळले. यामध्ये चार मजूर गाडले गेले. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला. मंदिर पडल्याचा मोठा आवाज होताच गावांतील नागरिक मंंदिराच्या दिशेने पळाले. मंदिराच्या मलब्यात पिराजी कोळी (वय २२, भंडारकोवढे, सोलापूर), महेश भोई (२३, रा. सोलापूर), उद्धव गंगाराम गुंडवड (५०, तांदुळवाडी, परभणी) हे तिघे अडकले.

या मजुरांना भरपावसात ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर अर्ध्या तासानंतर या मजुरांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना म्हसवड येथील हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, वेंकट दणकटवड यांचा मृत्यू झाला. या घटनेची म्हसवड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.