शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

हात निखळलेल्या श्रावणीला मदतीचा ‘हात’!

By admin | Updated: November 30, 2015 01:18 IST

माणुसकीची ठेव : भापकर यांच्याकडून वाढदिवसाची रक्कम अपघातग्रस्त बालिकेच्या नावे -- गुड न्यूज

मुराद पटेल --शिरवळ -देणाऱ्याने देत जावे... या उक्तीप्रमाणे सामाजिक बांधिलकी जोपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आदेश भापकर व मिञ परिवाराने लोहोम येथील अपघातग्रस्त श्रावणी राजेंद्र वाडकर या चिमुकलीला तिच्या भविष्यासाठी पन्नास हजारांची मदत केली. दुर्दैवाचा वज्राघात सहन करत असलेल्या श्रावणीसाठी भापकर यांनी ठेवीच्या रूपाने जणू माणुसपणाचीच ‘ठेव’ दिल्याची भावना वाडकर कुटुंबीयांनी व्यक्त केली.श्रावणी वाडकर हिचा हात तेलाच्या घाण्यात अडकल्यामुळे दुखावला होता. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, खांद्यापासून हात निखळला गेल्याने संपूर्ण हात श्रावणीला गमवावा लागला.दरम्यान, याबाबतची माहिती आदेश भापकर व उपसरपंच उदय कबुले व मित्र परिवाराला मिळताच त्यांनी तातडीने निर्णय घेत आदेश भापकर यांच्या वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत श्रावणी वाडकर हिच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलत ५० हजार दोनशे रुपयांची ठेव दहा वर्षाच्या मुदतीवर शिरवळ येथील शिवप्रेरणा पतसंस्थेमध्ये ठेवली. श्रावणीला ठेव पावतीची मुदत संपल्यानंतर एक लाख पंचवीस हजारांचा परतावा मिळणार आहे.आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते शिरवळ येथे श्रावणी वाडकर हिला ठेवपावती देण्यात आली. यावेळी आदेश भापकर, उपसरपंच उदय कबुले, बाजार समिती सभापती राजेंद्र तांबे, चंद्रकांत मगर, विजय पवार, चेतन बेलापूरकर, मोहन सोनावणे, काका राऊत, बाळासाहेब जाधव, राजेश शेटे, मधुकर आंबवले, पिंटू दळवी, आत्माराम पिसाळ, स्वप्नील जाधव, राजेंद्र वाडकर, संतोष पाटील आदी उपस्थित होते. आमदारांकडूनही मदतीचा शब्दशिरवळ येथे आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते ठेव पावतीचा धनादेश श्रावणी वाडकर हिला देण्यात आला. या कार्यक्रमात आ. मकरंद पाटील यांनीही श्रावणीला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.असा घडला अपघात...लोहोम, ता. खंडाळा येथील श्रावणी राजेंद्र वाडकर ही सहा वषार्ची चिमुकली आईसमवेत शेंगदाणे तेल गाळण्यासाठी घाण्यावर गेली होती. खेळत असताना श्रावणीने अंगावरील ओढणी हाताला गुंडाळून गोल फिरवत होती. ती ओढणी अचानकपणे घाण्यामध्ये अडकून श्रावणीचा ओढणीसह हातही घाण्यामध्ये अडकल्याने हात खाद्यापासून निखळला.