शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवाने आणली बाजारपेठेला झळाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:46 IST

सातारा : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी साताऱ्याची बाजारपेठ गजबजूून गेली आहे. शहरासह ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी मोठ्या ...

सातारा : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी साताऱ्याची बाजारपेठ गजबजूून गेली आहे. शहरासह ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी मोठ्या संख्येने बाजारपेठेत येत आहेत. गेल्यावर्षी संचारबंदीमुळे व्यापारी व विक्रेत्यांचे प्रचंड नुकसान झाले. यंदा बाजारपेठ खुली झाल्याने व्यापाऱ्यांचे चेहरे आनंदाने खुलले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागूू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे गेल्या दोन वर्षांपासूून सण, उत्सवांवर निर्बंध घालण्यात आले. कोरोना संक्रमण कमी होताच निर्बंधदेखील शिथिल करण्यात आले. उद्योग, व्यवसाय सुरू झाले. बाजारपेठ खुली करण्यात आली; परंतु सण, उत्सवांवरील निर्बंध अद्यापही कायम ठेवण्यात आले आहेत. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाने यंदाही नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसारच गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. परंतु, यंदा बाजारपेठ पूर्ण क्षमतेने खुली झाल्याने व्यापारी, विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

गौरी व गणपतीच्या प्रतिष्ठापनेसाठी लागणाऱ्या विविध वस्तू, सजावटीचे साहित्य, लाकडांपासून बनविण्यात आलेले मखर, शोभेच्या वस्तू, विजेच्या माळा अशा वस्तूंची बाजारपेठेत मोठी आवक झाली आहे. या वस्तूंच्या खरेदी-विक्रीतून दररोज कोट्यवधींची उलाढाल होऊ लागली आहे.

(चौकट)

नियमांचे पालन गरजेचे

शहरासह ग्रामीण भागातील नागरिक दररोज खरेदीसाठी येत असल्याने बाजारपेठ गर्दीने गजबजून जात आहे. दरम्यान, बहुतांश नागरिक व दुकानदार कोरोना नियमावलीचे पालन करत असले, तरी कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे उत्सव काळात मास्कचा वापर करणे, फिजिकल डिस्टन्सचे पालन करणे गरजेचे आहे.

फोटो : ०६ जावेद खान

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्याची बाजारपेठ गजबजून गेली आहे. शहरी व ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी गर्दी करत आहेत. (छाया : जावेद खान)