शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सालईवाड्यातील गणेशोत्सव

By admin | Updated: October 4, 2015 23:45 IST

कोकणच्या लौकिकात भर : ११० व्या वर्षात पदार्पण; एकवीस दिवस होते पूजाअर्चा

प्रसन्न राणे- सावंतवाडी --कोकणातील संस्कृतीचे वैशिष्ट्य बनलेला गणेशोत्सव घराघरांतील वातावरणाला चैतन्यमयी आनंद देणारा असतो. याची परंपरा कोकणात कित्येक वर्षापासून सुरू आहे. येथील परंपरागत गणेशोत्सवातील मानाच्या गणपतीपैंकी सावंतवाडीतील सालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा गणपती मानाच्या गणपतींपैकी एक आहे. सर्व धर्मीयांतून या गणपतीची केली जाणारी पूजाअर्चा जिल्ह्यात नावलौकिक करून आहे. १९०६ ला सालईवाडा येथे सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यात आला. यंदा या मंडळाने ११० व्या वर्षात पदार्पण केले आहे. एकवीस दिवस चालणाऱ्या या गणेशोत्सवात कोकणवासीयांसह कोल्हापूर, सांगली, बेळगाव, गोवा येथीलही भाविक मोठ्या उत्साहाने यामध्ये सामील होतात. शिवाय दर्शनासाठी रांगाही सलग एकवीस दिवस येथे पाहावयास मिळतात.सालईवाडा येथे कै. विष्णुशेठ सापळे व कै. सीतारामशेठ बांदेकर यांनी १९०६ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन केले. सापळे कुटुंबीयांच्या वास्तूमध्ये कोकण भागातील पहिला गणेशोत्सव सुरू केला. सालईवाडा भागातील सर्वच मंडळींनी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग घेऊन गणेशाचे पूजन केले. जात-पात, धर्म, भेदभाव मनाशी न बाळगता सर्वांना गणरायाचे दर्शन घडावे, यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाचे पूजन करण्यात आले. प्रत्येकाच्या घरी गणरायाचे आगमन झालेले असते. मात्र, बाहेरून येणाऱ्या पर्यटक किंवा विविध धर्मांतील लोकांना श्री गणरायाचे दर्शन मिळावे, यासाठी कोकणात पहिला गणेशोत्सव या मंडळाने सुरू केला, तर २१ दिवस भक्तिभावाने, श्रद्धेने गणरायाचे पूजन केले जाते.१९४० ते १९५० या कालखंडात सि. द. पडते (दादा), अण्णा सावंत, भास्कर निखार्गे, गुंडू बांदेकर, सखाराम (चिटलिंग) चौकेकर, श्याम चिंगळे, दत्ता वेंगुर्लेकर, भाऊ सापळे, तात्या सापळे, मोतिराम नार्वेकर, पांडुरंग ठाकूर, काशिनाथ कुडतरकर, दादा भोसले, आबा पेडणेकर, जगन्नाथ व विश्वनाथ तळवणेकर यांनी मंडळातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक गणेशोत्सवाची जबाबदारी सांभाळली. सुरुवातीला आकर्षक मूर्ती तयार करणे व गणपतीपुढील सजावट करण्याची जबाबदारी कै. आबा पेडणेकर यांनी सांभाळली होती. १९५१ ते १९८० या काळात मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सि. द. पडते यांनी सांभाळली. १९६० ते ७० या दशकात सालईवाड्यातील सर्व महिलांना एकत्र आणण्याचे काम शालिनी नाटेकर व लता पेडणेकर यांनी केले. १९७० पासून ही जबाबदारी कमल विर्नोडकर यांनी समर्थपणे सांभाळली. तसेच १९८१ ते १९९० या काळात सालईवाड्यातील उत्साही तरुण अमरनाथ सावंत व राजा स्वार यांना मंडळामध्ये सामावून घेण्यात आले व श्री गणेशोत्सवाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली.सापळे कुटुंबीयांच्या ज्या वास्तूमध्ये हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला, ती संपूर्ण वास्तू जमिनीसह १९९० मध्ये श्रीमती राधाबाई केशव सापळे यांनी त्यांचे पती कै. केशव विष्णू सापळे यांच्या स्मरणार्थ मंडळाच्या स्वाधीन बक्षीसपत्राने केली.सध्या या मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण सापळे, उपाध्यक्ष अ‍ॅड. दीपक नेवगी, खजिनदार अशोक बांदेकर, सचिव गुरुदास पेडणेकर, सहसचिव साबाजी नार्वेकर तसेच सदस्य कमल विरनोडकर, अमरनाथ सावंत, अपर्णा खानोलकर, शिवप्रसाद बांदेकर तसेच यावर्षीचे उत्सव समितीचे अध्यक्ष राजा स्वार उत्सव दिमाखात साजरा करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.भरगच्च कार्यक्रमांचा जागरसालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव हा २१ दिवस साजरा करण्यात येतो. या दिवसात या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. रोज सायंकाळी भजनांच्या मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रमाला तर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. याशिवाय येथे भजनांचा डबलबारीचा कार्यक्रमही पंचक्रोशीत नावलौकिक करून आहे. विसर्जनादिवशी गणरायाची शहरातून वाजतगाजत काढण्यात येणारी मिरवूणक पाहावयास जिल्ह्यातील गणेशभक्तांचा जनसागर उसळलेला असतो. मोती तलावात गणरायाचे श्रद्धापूर्वक विसर्जन केले जाते.