शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळमधील जुगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 19:24 IST

अवैध दारू विक्री व जुगाराचा व्यवसाय चालवणाऱ्या कुडाळ, ता. जावळी येथील तीन जणांच्या टोळीला एक वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केली.

ठळक मुद्देकुडाळमधील जुगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपारतिघांविरोधात मेढा पोलीस ठाण्यात बरेच गुन्हे दाखल

सातारा : अवैध दारू विक्री व जुगाराचा व्यवसाय चालवणाऱ्या कुडाळ, ता. जावळी येथील तीन जणांच्या टोळीला एक वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केली.दीपक रामचंद्र वारागडे (वय ४५, टोळी प्रमुख), सुनील गोविंद गावडे (वय ३२) प्रवीण रामचंद्र वारागडे (वय ४४, सर्व रा. कुडाळ, ता. जावळी) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या तिघांविरोधात मेढा पोलीस ठाण्यात चोरटी दारू विक्री आणि अवैध जुगाराचे बरेच गुन्हे दाखल आहेत.

वारंवार त्यांना सुधारण्याची संधी देण्यात आली. मात्र, तरीही त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच राहिल्यामुळे मेढा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी निळकंठ राठोड, पोलीस हवालदार संजय शिर्के, पोलीस कॉन्स्टेबल संजय काळे यांनी या तीन जणांच्या टोळीला सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे सादर केला होता. त्या प्रस्तावावर सुनावणी होऊन या तीन जणांच्या टोळीला एक वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर