शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: आसाममध्ये पुन्हा 'हिमंत' सरकार; आज शपथविधी
3
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
4
अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?, विधानसभेत आमदारांमध्ये दोन गट; मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा देण्यावरून वाद
5
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
6
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
7
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
8
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
9
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
10
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
11
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
12
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
13
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
14
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
15
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
16
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
17
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
18
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
19
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
20
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कास परिसरात रानगव्याचे वारंवार दर्शन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:40 IST

पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस कास पठार परिसरात पर्यटकांना रानगव्यांच्या कळपाचे वारंवार दर्शन होत आहे. सोमवारी ...

पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस कास पठार परिसरात पर्यटकांना रानगव्यांच्या कळपाचे वारंवार दर्शन होत आहे. सोमवारी सकाळी चक्क महाकाय रानगव्यांचे दर्शन बहुतांशी वाहनचालक दूरवर गाडी उभी करून घेताना दिसत होते. तसेच काही वाहनचालकांनी चारचाकीतूनच या रानगव्याची छबी कॅमेऱ्यात टिपली. परंतु, त्यांच्या मनामध्ये चांगलीच भीती निर्माण झालेली दिसून येत होती.

सातारा शहराच्या पश्चिमेला २५ किलोमीटर अंतरावर कास पठार हे जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. नेहमीच या ठिकाणी जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील बहुसंख्य पर्यटकांच्या गर्दीने कास पठार परिसर बहरलेला दिसतो. त्यात कधीही पाहण्यास न मिळालेले दुर्मीळ रानगवे कास पठार परिसरात पाहायला मिळाल्याने पर्यटकांना पर्वणीच ठरत आहे. बैलकुळातील गवा हा सर्वात मोठा प्राणी असून कास परिसरातील दाट, घनदाट जंगलात त्याचे कळपाने वारंवार दर्शन घडल्याचे स्थानिकांमधून बोलले जाते. यापूर्वी बहुतांशी वेळा पारंबेफाटा ते एकीव या मार्गावरून प्रवास करताना वाहनचालक उत्सुकतेपोटी या गव्यांची छायाचित्रे काढतात खरं; परंतु कोणत्याही क्षणी गव्याचा हल्ला होऊ शकतो, या हेतूने अगोदरच वाहने वळवून लावण्याची त्यांची धडपड असते.

निसर्गाचे वरदान असलेल्या कास या पर्यटनस्थळी रानगव्यांच्या वारंवार झुंडी दिसत असल्याने काहींना याची पर्वणी तर काहींची भंबेरी उडताना दिसत आहे. कासच्या दाट जंगलात गव्यांचा वावर आहे. पाणवठ्याच्या ठिकाणी गव्यांचा कळप बहुतांशी वेळा पाहावयास मिळतो. गेल्या एक-दोन महिन्यांत कास पठार परिसरात महाकाय रानगव्यांचे अनेकांनी वारंवार दर्शन घेतले.

(चौकट)

पर्यटनप्रसंगी वन्यपशूंपासून सावध राहा...

अचानक रानगवे समोर आले तर त्यांची कोणतीही चेष्टा करू नये, तसेच दगड अथवा काहीही वस्तू फेकू नये, त्याला चिडविण्याचादेखील प्रयत्न करू नये. त्यांच्या मार्गात अडथळा उभा न करता ते तेथून शांतपणे निघून जातात. परंतु, त्यांना त्रास दिला गेल्यास ते हल्ला करतात. रानगवा समोर दिसल्यास पर्यटकांनी तेथून दूर जावे. दरम्यान, पर्यटनप्रसंगी वन्यपशूपासून सावध राहावे, असे स्थानिक ग्रामस्थांतून बोलले जाते.