शिवक्रांती हिंदवी सेनेच्यावतीने किल्ले संवर्धन मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:06 IST2021-01-08T06:06:42+5:302021-01-08T06:06:42+5:30

कुडाळ : शिवक्रांती हिंदवी सेना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने दुर्गवारी संकल्पनेतून स्वराज्याचे शस्त्रागार वैराटगड येथे किल्ले संवर्धन मोहीम राबविण्यात आली. ...

Fort conservation drive on behalf of Shivkranti Hindavi Sena | शिवक्रांती हिंदवी सेनेच्यावतीने किल्ले संवर्धन मोहीम

शिवक्रांती हिंदवी सेनेच्यावतीने किल्ले संवर्धन मोहीम

कुडाळ : शिवक्रांती हिंदवी सेना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने दुर्गवारी संकल्पनेतून स्वराज्याचे शस्त्रागार वैराटगड येथे किल्ले संवर्धन मोहीम राबविण्यात आली.

या संघटनेच्यावतीने शिवजन्मोत्सव २०२१ साठी वैराटगडावरील पांडवटाके, शिवपिंड, तळमाची, प्राचीन गुहा, पाण्याचे तलाव, महाद्वार, पिण्याचे पाणी, सरदारांचे वाडे, पहारेकरी देवड्या, चोरवाट, ध्वजस्तंभ, उताणा मारुती, शिवकालीन विहीर, बालसिद्धनाथ मंदिर या सर्व ठिकाणचे नामकरण फलक लावण्यात आले. गेल्या पाच वर्षांपासून शिवक्रांती संघटना अशाप्रकारची शिवकालीन गडकिल्ल्याच्या संरक्षणाची मोहीम राबवत आहेत. फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांनी वैराटगडावर शिवमूर्ती स्थापन केली असून, दरवर्षी गडाच्या पायथ्याशी शिवजन्मोत्सव साजरा करतात. यावेळी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आणि देशसेवा बजावणाऱ्या सैनिकांचा सन्मान केला जातो. दि. ३ जानेवारी या दिवशी गडावरील पाणवठ्याची स्वच्छता करणे, तळी साफ करणे, तटबंदीच्या संरक्षणासाठी झाडे कापणे आदी कामे केली. यावेळी संदेश धोत्रे, अनिकेत धनावडे, आकाश जाधव, प्रताप जगताप, विराज पिसाळ, देवांग चव्हाण, श्रीजय कदम, भास्कर पवार, उपाध्यक्ष प्रवीण कदम, संस्थापक-अध्यक्ष स्वप्नील धनावडे यांनी श्रमदान केले.

Web Title: Fort conservation drive on behalf of Shivkranti Hindavi Sena