शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

अकृषिक वापर समिती गठीत

By admin | Updated: July 15, 2015 21:14 IST

अप्पर जिल्हाधिकारी अध्यक्ष : कार्यशाळा घेण्याच्या सूचना

सातारा : औद्योगिक प्रयोजनाकरिता जमिनीचा अकृषिक वापर सुलभ करण्याकरिता उद्योजकास विविध विभाग व प्राधिकरण यांच्याकडून आवश्यक अधिकृत प्रमाणित माहिती एक खिडकी संरचनेअंतर्गत एकत्रितरीत्या उपलब्ध व्हावी, याकरिता प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक अकृषिक वापर सहाय्यभूत समिती गठीत करण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील कलम ४४ अंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांशी निगडीत संबंधित विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करून शासनाच्या या निर्णयाबाबत अवगत करावे, असे आदेश महसूलचे प्रधान सचिव मनूकुमार श्रीवास्तव यांनी दिले.या समितीमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नामनिर्देशित केलेला उपमुख्यकार्यकारी अधिकारी दर्जाचा अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा प्रादेशिक अधिकारी, सहायक संचालक नगररचना जिल्हा शाखा कार्यालय, जलसंपदा विभागाचा कार्यकारी अभियंता यापेक्षा कमी दर्जा नसलेला जिल्हास्तरीय अधिकारी, जलसंधारण विभागाचा कार्यकारी अभियंता यापेक्षा कमी दर्जा नसलेला जिल्हास्तरीय अधिकारी, जिल्हा उद्योग अधिकारी तथा महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, महापारेषण व महावितरण या कंपन्यांचा कार्यकारी अभियंता यापेक्षा कमी दर्जा नसलेला जिल्हास्तरीय अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी, उप वनसंरक्षण हे सदस्य आहेत. तर निवासी उपजिल्हाधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव आहेत.महसूल विभागाचे प्रधान सचिव मनूकुमार श्रीवास्तव यांनी २३ जून रोजी सर्व अप्पर जिल्हाधिकारी यांना याबाबत पत्र पाठविले आहे. या समितीने प्रत्येक महिन्यामध्ये दोनवेळा अथवा आवश्यकतेनुसार बैठक घेऊन कलम ४४-अ अन्वये औद्योगिक अकृषिक वापर सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना आवश्यक वस्तुनिष्ठ माहिती, अर्ज प्राप्त झाल्यापासून पुढील पंधरा दिवसांमध्ये उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी) माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईया अनुषंगाने जिल्ह्यातील कलम ४४ अंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाशी निगडीत संबंधित विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करून शासनाच्या या निर्णयाबाबत अवगत करावे, राज्य शासनाने या समितीची स्थापना उद्योजकांना सहाय्य होणेसाठी केली असून, याप्रती राज्य शासन अत्यंत गंभीर आहे, याची जाणीव संबंधितांना करून देऊन माहिती उपलब्ध करून न दिल्यास या शासन निर्णयान्वये होणाऱ्या कारवाईबाबतही जाणीव करून द्यावी, असेही या पत्रात म्हटले आहे.