शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
2
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
3
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
4
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
5
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
6
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
7
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
8
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
9
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
10
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
11
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
12
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
13
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
14
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
15
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
16
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
17
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
18
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
19
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
20
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याकडेला कचरा टाकणाऱ्यांवर फौजदारी

By admin | Updated: December 2, 2014 21:28 IST

मलकापुरात मोहीम : चारशे जणांना नगरपंचायतीची नोटीस

मलकापूर : शहरातील नगरिकांना वारंवार सूचना देऊनही रस्त्याकडेला कचरा टाकण्याचे प्रमाण वाढतच आहे़ यापुढील काळात रस्त्याकडेला किंवा सार्वजनिक जागेवर कचरा टाकणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय येथील स्थानिक प्रशासनाने घेतला आहे़ या मोहिमेची पूर्वसूचना म्हणून नगरपंचायतीने सुमारे ४०० जणांना नोटिसा दिल्या आहेत़
मलकापूर शहरातील काही भागात स्वच्छतेबरोबर नागरिकच दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे़ दोन्ही उपमार्गालगतचे व्यावसायिक व काही नागरिक घरातील कचरा राजरोसपणे रस्त्याकडेलाच टाकत आहेत़ वारंवार सूचना देऊन किंवा वेळोवेळी घंटागाडी व कचरा गोळा करण्यासाठी वाहने फिरत असतानाही कचरा रस्त्याकडेलाच टाकला जातो़
यावर प्रतिबंध म्हणून कचरा रस्त्यावर टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही नगरिकांमधून होत आहे़ याचा विचार करून महामार्गाच्या दुतर्फा असणारे व्यवसायिक व नागरिक, मोरया कॉम्प्लेक्स परिसर व झेड़ पी़ कॉलनी परिसरातील सुमारे ४०० नागरिकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत़ यापुढील काळात उघड्यावर व रस्त्याकडेला कचरा टाकणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय मलकापूर नगरपंचायत प्रशासनाने घेतला आह़े़ (प्रतिनिधी)


कारवाईचा निर्णय स्तुत्य
शहरातील दोन्ही उपमार्ग व कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यांवर सकाळी फिरायला येणारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ मात्र रस्त्याकडेला ठिक-ठिकाणी कचऱ्याचे ढीग असतात़ यामध्ये अनेक हॉटेल व्यवसायिक उरलेले अन्न टाकतात़ त्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण होते़ याशिवाय अशा ठिाकणी कुजलेले अन्न खाण्यासाठी कुत्र्यांच्या झुंडी जमा होतात़ मोकाट कुत्र्यांचाही फिरणाऱ्यांना उपद्रव होतो़ त्यामुळे उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय स्तुत्य आहे़, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे़


स्थानिक प्रशासनाच्या वतीने कचरा गोळा करण्यासाठी पाच घंटागाड्या व दोन ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली आहे़ मात्र, काही ठिकाणी आजही कचरा रस्त्याकडेला टाकला जातो़ वारंवार प्रबोधन करूनही काही नागरिक व व्यवसायीक आडमुठे धोरण स्वीकारतात़ म्हणून यापुढे कचरा उघड्यावर किंवा रस्त्यावर टाकल्यास फौजदारी गुन्हा दाखल करणार आहोत़
- राजेंद्र तेली, मुख्याधिकारी