शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणाऱ्या शेतकऱ्यांचा आदर्श घ्यावा : सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:40 IST

फलटण : ‘हवामानातील बदल, अवकाळी पाऊस, कीड रोग व नैसर्गिक आपत्तीशी सामना करताना शेतकरी शेती फुलविण्याचे प्रयत्न करीत ...

फलटण : ‘हवामानातील बदल, अवकाळी पाऊस, कीड रोग व नैसर्गिक आपत्तीशी सामना करताना शेतकरी शेती फुलविण्याचे प्रयत्न करीत आहेत. अशा कष्टकरी व नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणाऱ्या शेतकऱ्यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घ्यावा,’ अशी अपेक्षा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केली आहे.

काळज, ता. फलटण येथील पेरु बागांची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी सिंह यांनी फलटण तालुक्यातील गिरवी, निरगुडी येथील द्राक्ष, डाळींब बागा, शेवगा शेती व शेत तळ्यातील मत्स्य शेतीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन व विकास समिती सदस्य रामदास कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, उपविभागीय कृषी अधिकारी भास्कर कोळेकर, प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग व शेतकरी उपस्थित होते. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी यांची सदिच्छा भेट घेतली.

निरगुडी येथे भानुदास जगन्नाथ तावरे यांच्या सुमारे १७ एकर क्षेत्रातील द्राक्ष बागेची पाहणी द्राक्ष उत्पादन तंत्रज्ञान, विक्री व्यवस्थापन, मिळणारा बाजारभाव याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतली. त्यानंतर गिरवी फलटण येथे प्रगतशील शेतकरी रामदास कदम यांच्या द्राक्ष बाग, शेवगा शेती, शेत तळ्यातील मत्स्य शेती या प्रकल्पांची पाहणी करून तेथील उत्पादन, बाजार पेठ, नैसर्गिक आपत्तीमधून पिके वाचविण्यासाठीच्या उपाय योजना याबाबत सविस्तर माहिती घेतली. अवकाळी पाऊस, बदलते हवामान यामुळे होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी केलेल्या उपाय योजनांचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले.

द्राक्ष व इतर फळ पिकांसाठी अच्छादन करताना वापरण्यात येणारे कागद व त्यासाठी उभारावा लागणारा लोखंडी सांगाडा ही खर्चिक बाब असल्याने त्यासाठी शासकीय अनुदान मिळावे, अशी मागणी यावेळी रामदास कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

फोटो : १२ नसीर शिकलगार

फलटण तालुक्यातील काळज येथील शेतीची जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पाहणी केली. यावेळी भाऊसाहेब काटे, ब्रम्हदेव दुधाळ, उमेश निंबाळकर, गजानन ठोंबरे, रामदास कदम उपस्थित होते.