शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणाऱ्या शेतकऱ्यांचा आदर्श घ्यावा : सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 18:27 IST

collector Visit Sataranews- हवामानातील बदल, अवकाळी पाऊस, कीड रोग व नैसर्गिक आपत्तीशी सामना करताना शेतकरी शेती फुलविण्याचे प्रयत्न करीत आहेत. अशा कष्टकरी व नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणाऱ्या शेतकऱ्यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घ्यावा, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणाऱ्या शेतकऱ्यांचा आदर्श घ्यावा : सिंह

फलटण : हवामानातील बदल, अवकाळी पाऊस, कीड रोग व नैसर्गिक आपत्तीशी सामना करताना शेतकरी शेती फुलविण्याचे प्रयत्न करीत आहेत. अशा कष्टकरी व नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणाऱ्या शेतकऱ्यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घ्यावा, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केली आहे.काळज, ता. फलटण येथील पेरु बागांची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी सिंह यांनी फलटण तालुक्यातील गिरवी, निरगुडी येथील द्राक्ष, डाळींब बागा, शेवगा शेती व शेत तळ्यातील मत्स्य शेतीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी जिल्हा नियोजन व विकास समिती सदस्य रामदास कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, उपविभागीय कृषी अधिकारी भास्कर कोळेकर, प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग व शेतकरी उपस्थित होते. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी यांची सदिच्छा भेट घेतली.निरगुडी येथे भानुदास जगन्नाथ तावरे यांच्या सुमारे १७ एकर क्षेत्रातील द्राक्ष बागेची पाहणी द्राक्ष उत्पादन तंत्रज्ञान, विक्री व्यवस्थापन, मिळणारा बाजारभाव याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतली. त्यानंतर गिरवी फलटण येथे प्रगतशील शेतकरी रामदास कदम यांच्या द्राक्ष बाग, शेवगा शेती, शेत तळ्यातील मत्स्य शेती या प्रकल्पांची पाहणी करून तेथील उत्पादन, बाजार पेठ, नैसर्गिक आपत्तीमधून पिके वाचविण्यासाठीच्या उपाय योजना याबाबत सविस्तर माहिती घेतली. अवकाळी पाऊस, बदलते हवामान यामुळे होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी केलेल्या उपाय योजनांचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले.द्राक्ष व इतर फळ पिकांसाठी अच्छादन करताना वापरण्यात येणारे कागद व त्यासाठी उभारावा लागणारा लोखंडी सांगाडा ही खर्चिक बाब असल्याने त्यासाठी शासकीय अनुदान मिळावे, अशी मागणी यावेळी रामदास कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीFarmerशेतकरीSatara areaसातारा परिसर