शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

एक किलोत म्हणे पाच भाज्या !

By admin | Updated: September 11, 2014 23:18 IST

पितृपंधरवडा : वाढत्या दरावर सामान्यांनी काढला तोडगा

सातारा : पितृपंधरवड्याचे सोपस्कर करण्यासाठी आवश्यक असलेली भाजी चांगलीच महागली आहे. या महागाईवर मार्ग काढण्यासाठी सामान्यांनी आता नामी शक्कल काढली आहे. या विधीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व भाज्या एकत्र करून त्या एक किलो घेणे आता स्वस्त पडत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक एक किलो मिक्स भाजी घेवून हा विधी पार पाडत असल्याचे चित्र अनेक घरांमध्ये दिसत आहे.अवकाळी पाऊस आणि भाज्यांवर पडलेला आजार यामुळे यंदा भाज्यांची आवकही मंदावली असल्याचे चित्र दिसते. पितृपंधरवड्यात गवारी, भोपळा, भेंडी, ढेसा, बटाटा, मेथी या भाज्यांना विशेष मागणी असते. या भाज्यांची मागणी वाढल्याने याचे दर सामान्यांच्या अवाक्या बाहेर गेले आहेत. मंडईत सरासरी वीस रूपये पावशेर या दराने भाजी मिळत आहे. सगळ्या भाज्या पावशेर घ्यायच्या म्हटलं तर ते १२० ते १५० रूपयांपर्यंत जाते. यापेक्षा मिक्स भाजी घेतली तर ८० रूपयात काम होते, असे सामान्यांचे मत आहे.पितृपंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर भाजी मंडईत भाज्या कडाडल्या असून, भेंडी, कारले व हिरव्या मिरचीचे दर प्रतिकिलो ८० रुपये एवढे भडकले आहेत. पालेभाज्यांचे दरही भडकले असून, भेंडी, कारले व वाटाणा प्रतिकिलो ८० रुपये, गवारी, भेंडी व दोडका ६० रुपये, पावटा, सिमला मिरची, वांगी ४० रुपये, टोमॅटो व बटाटो ३० रुपये, कोबी,काकडी व कांदा २० रुपये, मेथी पेंडी वीस रुपये व कोथिंबीर पेंडी १५ ते २० रुपये असा दर कडाडला आहे. (प्रतिनिधी)पितृपंधरवड्यामुळे बाजार समितीत भाज्यांची मोठ्या प्रमाणावर आवक वाढली आहे. मात्र, वाढत्या भाजीच्या किंमतीचे दर लक्षात घेवून पितृपंधरवड्याची केवळ औपचारिकता पूर्ण करण्याकडे अनेकांचा कल असल्याचे दिसते.पितृपंधरवड्यासाठी सपक भाजी करण्यात येते. बऱ्याच घरांमध्ये यातील अनेक भाज्या अनिच्छेने खालल्या जातात. त्यामुळे नागरिकांनी एकत्र भाज्या घेवून जावून विधी करण्याचे नियोजन केले आहे.