दारूच्या नशेत हवेत गोळीबार

By Admin | Updated: November 6, 2015 23:38 IST2015-11-06T23:29:10+5:302015-11-06T23:38:09+5:30

माजी सैनिक : पिस्तूल, मॅगझीन, काडतूस जप्त

Firing of drunken alcohol | दारूच्या नशेत हवेत गोळीबार

दारूच्या नशेत हवेत गोळीबार

सातारा: दारूच्या नशेत एका माजी सैनिकाने स्वत:जवळील पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याने बुधवारी रात्री औद्योगिक वसाहतीत एकच खळबळ उडाली. संबंधित माजी सैनिकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून एक पिस्तूल, मॅगझीन आणि एक जीवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, औद्योगिक वसाहतीमधील सुटकेस चौकामध्ये बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एका व्यक्तीने हवेत गोळीबार केला. हा प्रकार काही लोकांनी पाहिला होता. त्यानंतर यासंदर्भात नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली असता, गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नागरिकांकडून वर्णन समजले. त्यावरून पोलिसांनी विजय गुलाबराव यादव (वय ३५, रा. चंदनगर,सातारा, मूळ रा. वर्णे ता.सातारा) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर ‘माझ्याकडून दारूच्या नशेत हा प्रकार घडला असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.’ त्याच्याकडे पिस्तुलाचा परवाना असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
मात्र सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे गोळीबार करणे हा कायद्याने गुन्हा असल्याने पोलिसांनी आर्म अ‍ॅक्टनुसार यादववर गुन्हा दाखल केला. सचिन बंडू साळुंखे (वय ३५, रा. देगाव ता. सातारा) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली
आहे. (प्रतिनिधी)


 

Web Title: Firing of drunken alcohol